जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केली सत्कार
अहरी:- देवलमरी ग्राम पंचायतचे तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. व बहुमत असल्याने देवलमरी ग्राम पंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच राष्ट्रवादी पक्षाचे आहेत.
मात्र काही कारणांनी तीन ग्राम पंचायत सदस्य श्री.लक्ष्मण लालू आत्राम,संजुबाई शंकर आत्राम,सौ.विमला बापू कुर्री यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून आदिवासी विध्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केले.
आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रवेश केले.
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या अहेरी येतील जन सम्पर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आली.सदर सदस्याच्या जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली.
यावेळी देवलमरी ग्राम पंचायतचे सदस्य श्री.हरीष गावडे,ग्राम पंचायत सदस्या सौ.विद्या श्रीनिवास राऊत,माजी उपसरपंच श्री.जगनाथ मडावी,श्रीनिवास राऊत,राकेश कुर्री,किशोर कुर्री,प्रशांत गोडशेलवार,कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गे, आदि उपस्थित होते.