समाज एकसंघटीत असले की, विकास कोणीच रोखू शकत नाही माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन

69

सिरोंचा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा
वृक्षारोपनही करण्यात आले

सिरोंचा:- आदिवासी समाज एकसंघटीत असले की, विकास कोणीच रोखू शकत नाही असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.
त्या सोमवार 9 आगष्ट जागतिक आदिवासी दिनी येथील गोटूल भूमीत ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व आदिवासी गोंडवाना गोटूल समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर प्रामुख्याने आदिवासी गोंडवाना गोटूल समितीचे अध्यक्ष मधुकर मडावी, सचिव शंकर चिंतुरी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र मरसकोल्हे, सचिव जयभगवान मडावी, समय्या कुळमेथे, प्रकाश तलांडे, वैशाली मडावी, मधुकर कोल्लूरी, प्रभाकर शानगोंडा, कोवे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, आदिवासी समाज मूळ निवासी असून, स्वातंत्र्य व अन्य क्रांतिकारक लढ्यात आदिवासी थोर पुरुषांचे फार मोठे योगदान आहे. वेळेप्रसंगी प्राणाची आहुती व जीवाची बाजी लावून समाजासाठी सर्वस्वी अर्पण केले त्यामुळे आदिवासी समाजातील प्रत्येकांनी थोर महात्म्याचे प्रेरणा व आदर्श नजरेसमोर ठेऊन समाज एकसंघटीत असला की सर्वांगीण विकास होतो, शिक्षण, संघटन व संघर्ष या त्रिसूत्री तत्वांचा वापर करून मुख्यतः आदिवासी समाजातील मुले व मुलींनी उच्च व दर्जेदार शिक्षण घेऊन उच्च पदस्थ पदी विराजमान व्हावे असे म्हणत भाग्यश्रीताई आत्राम यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी भाग्यश्रीताई आत्राम यांनी सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण आणि वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्या नंतर गोटूल भूमी परिसरात भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पोरतेट यांनी तर उपस्थितांचे आभार दामोदर सिडाम यांनी मानले. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.