गडचिरोली:- आज दिनांक नऊ ऑगस्ट २०२१ रोजी सोमवारला महा अनिसचा ३२ वा वर्धापन दिन तथा जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिन शहर शाखा गडचिरोली चे वतीने मध्यान्हा नंतर चार वाजता महा अनिस कार्यालय गडचिरोली येथे घेण्यात आला . अध्यक्षस्थानी शहर शाखेचे अध्यक्ष माननीय श्री शब्बीर शेख तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री देवाजी सोनटक्के, श्री रोहिदासजी राऊत पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर शिवनाथ कुंभारे ज्येष्ठ सल्लागार तथा हितचिंतक, विठ्ठलराव कोठारे, श्री पंडित पुडके सर, श्रीमती कुसुमताई आलाम कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या, श्री उद्धव डांगे जिल्हा अध्यक्ष, श्री विवेक मून जिल्हा उपाध्यक्ष आदी उपस्थित होते. डॉ कुंभारे साहेब यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, अनिसच्या शाखा गावा गावात स्थापन करून अंधश्रद्धा निर्मूलनाची जबाबदारी येथील शाखेवर सोपवावी व जिल्हा समितीने त्यांना सतत वैचारिक मार्गदर्शन करत रहावे म्हणजे गावगाड्यातील अंधश्रद्धांचे निर्मूलन होण्यास मदत होईल. तर रोहिदासजी राऊत यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त करताना म्हणाले की, महा अंनिस चे कार्य प्रशंसनीय असेच आहे. या समितीला शासकीय स्तरावरून कोणताही निधी प्राप्त होत नसतानाही या समितीचे कार्यकर्ते गावागावात जाऊन अंधश्रद्धा, करणी, जादूटोणा आदीबाबत मार्गदर्शन करीत असतात. याव्यतिरिक्त इतर गरजूंना कधी साहित्य स्वरूपात तर कधी आर्थिक स्वरूपात मदत सुद्धा करीत असतात. त्यानंतर प्राध्यापक अमीर कुरील यांनी, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवायचे असेल तर शाळा-कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे म्हणजे भविष्यात हा युवक अंधश्रद्धा , भूत, भानामती, करणी ,जादूटोणा, बुवाबाबा यांच्या नादी लागणार नाहीत. श्रीमती कुसुमताई यांनी आदिवासीच्या शोषणावर प्रकाश टाकला. हा समाज भलेही आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसेल पण तो आजवर तरी कधी भीक मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्याचे जाणवत नाही. तो श्रमिक आहे. जल, जंगल, जमीन यांचे त्यांनी संरक्षण केलेले आहे. शहरातील शिकल्या-सवरल्या लोकांनी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याविषयी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. अनिस तर्फे आदिवासी बांधवामधील अंधश्रद्धा घालवण्याचे काम करून त्यांना विकासाच्या प्रवासात आणण्याचे काम करतात हे प्रसंशनीय आहे. श्री सोनटक्के सर यांनी गडचिरोली शाखेचे कार्यकर्ते शासनाकडून कोणतीही आर्थिक अनुदान नसताना स्वखर्चाने गावात , तांडे , टोल्यावर जाऊन समाजातील अंधश्रद्धा घालविण्याचे काम करीत असतात हे कौतुकास्पद आहे. आपला प्रपंच नीट चालवून फावल्या वेळेचा उपयोग सामाजिक कार्यासाठी घालवितात हे अभिनंदनीय आहे. महा आणि चे अध्यक्ष उद्धव डांगे सर यांनी समितीच्या कार्यकर्त्यांनी अनेक चढ-उतारला समर्पकपणे हाताळून अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे. काही सनातन्यांचा रोष पत्करून देखील ही चळवळ सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाची उन्नती करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व कार्यकर्ते तन मन धन सर्वतोपरी खर्च करून गेली बत्तीस वर्षांपासून अविरत कार्य करीत आहेत. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना शब्बीर शेख म्हणाले की, या संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद होत असल्यामुळे सर्वच कार्यकर्ते लहान मोठेपणा हा भेद न ठेवता किंवा पदासाठी न भांडता समितीचे उपक्रम राबवायचे जाहीर केले की त्याला पूर्णत्वास नेण्याचे काम करतात या संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये कुठलेही हेवेदावे नाहीत ही आनंदाची बाब आहे. या समितीतील कार्यकर्त्यांचे गोडवे गावेत तेवढे कमीच आहेत. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जे जे समितीशी जोडले त्यांना प्रत्येकांना ही संघटना आपली मातृच आहे , तिनेच आम्हाला एक नवी ओळख दिली. समाजात आमच्याकडे सामाजिक परिवर्तन करणारे हाडामासाचे कार्यकर्ते म्हणून पाहिले जाते आणि जेव्हा रस्त्यावर भेटून सामान्य नागरीक आमच्या कार्याची प्रशंसा करतात तेव्हा आमचे ऊर मोठ्या अभिमानाने भरून येते. याप्रसंगी श्री भोजराज कानेकर , विलास निंबोरकर, श्री हरिदास कोटरंगे , पुरुषोत्तम चौधरी यांनी गडचिरोली शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच आम्हाला अनिस ने काय दिले यावर प्रकाश टाकण्यात आला. सर्व प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक तथा अध्यक्षांनी अनिसच्या कार्याची प्रशंसा करून काही महत्वाच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विठ्ठलराव कोठारे यांनी केले. संचलन प्राध्यापक विलास पारखी, विलास निंबोरकर यांनी तर आभार प्रदर्शन गोविंदराव ब्राह्मणवाडे यांनी केले. श्री पुरुषोत्तम ठाकरे यांनी डॉक्टर दाभोळकर यांना अभिवादन करणारे व हम होंगे कामयाब हे गीत सुरेल आवाजात सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला खालील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमलाकर वारके, उद्धव बांगरे, दामोदर उप्परवार, कोपेश कुमरे, वर्षा राजवाडे, हरिदास कोटरंगे, पुरुषोत्तम लेनगुरे, भोजराज कानेकर, प्रमोद राऊत, श्री राजगड साहेब, सौ ग्रीष्मा मून आदी कार्यकर्ते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.