राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आरमोरी येथे प्रहार सदस्य नोंदणीला सुरवात

75

गडचिरोली:- राज्यमंत्री तथा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू प्रहार राज्याध्यक्ष अनिलभाऊ गावंडे तथा कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ मराठवाडा येथील प्रहार कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांची अकोला येथे झालेल्या बैठकीत प्रहार सद्स्य नोंदणी कार्यक्रम 9 आगष्ट पासून प्रत्येक जिल्ह्यात घेण्याचे आवाहन मा. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले होते त्यानुसार मा राज्यमंत्री बच्चूभाऊ यांच्या आदेशाने व महाराष्ट्र अध्यक्ष श्री.अनिलभाऊ गावंडे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री.बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.10/08/2021 रोजी शासकीय विश्रामगृह आरमोरी येथे प्रहार सद्स्य नोंदणीला सुरुवात केली. यासोबतच पक्ष संघटन वाढविणे बाबत चर्चा तसेच उपस्थित असलेल्या काही जणांच्या समस्येवर ही चर्चा करण्यात आली
यात अनेक जणांनी प्रहारची सद्स्य नोंदणी केली.
यावेळी तालुक्यातील प्रहार पदाधिकारी तसेच प्रहार सेवकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.