गडचिरोली चामोर्शी महामार्गाच्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाका अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन :- सुनीलभाऊ पोरेड्डीवार

169

गडचिरोली:- गडचिरोली-चामोर्शी महामार्गाचे कांग्रेट रोडचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे सदर काम फारच संतगतीने सुरू असून एका बाजुला काही भागाचे रोडचे कांग्रेटचे काम केले असून तेही काम पूर्ण केले नसुन गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात भयानक स्थिती निर्माण झाली आहे.काही भागात रोडचे कांग्रेटिकरन न करता प्याचेस जसेच्या तसे अनेक महिन्यापासून ठेवलेले आहे.उन्हाळ्यात धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. व आता पावसाळा सुरू झाल्याने सदर प्याचेसमध्ये भयानक खड्डे निर्माण झालेले असुन अनेक मोटरसायकल या भागात स्लीप होऊन पडलेले आहेत.

पैदल जाणाऱ्यांच्या अंगावर चिखल उधळत आहे.तसेच एका बाजूच्या रस्त्याने कांग्रेटिकरन नसल्याने जड ट्रक वाहतुक अपूर्ण भागात फसल्याने अनेक तास वाहतुक खोळंबली असल्याने अनेक तास जाणारे -येणारे लोकांना ताटकळत रहावे लागते.या कंत्रातदाराने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक ते शासकीय विज्ञान महाविद्यालय पर्यंत दुसरी बाजू खोदून फक्त खोल करून ठेवली असून त्यामध्ये मुरूमसुद्धा भरलेला नाही.त्यामुळे सदर भागात पावसाळा सुरू असल्याने पाणी तुडुंब भरलेले आहे.व तलावासारखा स्वरूप या भागात निर्माण झालेला आहे.या पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.रोडला लागून अनेकांची मोठमोठ्या इमारती असून त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना डासांचा व रदारीचा त्रास वाढलेला आहे.याचा परिणाम लोकांना सहन करावे लागत असूनही कंत्राटदार हा जाणूनबुजून कामात दिरंगाई करीत असून याला जनतेच्या त्रासाचे काही फरक पडताना दिसत नाही.उलट या बाबीला कार्यकारी अभियंता यांचे सुद्धा पाठबळ असल्याचे दिसून येते.या कंत्रातदाराचे केंद्र सरकारकडे साटेलोटे असल्याने काहीतरी कारण सांगुन मुदतवाढ मागून घेत आहे.याबाबत अनेकदा तक्रार झालेली असूनसुद्धा कंत्रातदारावर याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कोरोनाकाळात शासकीय कामे नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश असताना कंत्रातदाराची वागणूक जनतेला त्रास देण्याची आहे.तरी आपण याची दखल घेऊन संबंधित कंत्रातदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करावी.येत्या आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.व एका आठवड्यात काम सुरू न झाल्यास या अन्यायाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता याना निवेदनातून सुनीलभाऊ पोरेड्डीवार शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख यांनी दिला.