आष्टी-
रविवारी आष्टी पेपर मिल कॉलनीत अंश मोरे या 8 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला.बिबट्याचा तावडीत सापडलेल्या अंशला आष्टी पेपर मिल मध्ये कार्यरत सुरक्षा रक्षक परवेश सिंग यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काठीने बिबट्याचा प्रतिकार केला.व अंशचा जीव वाचविला.त्यांनी दाखिवेलेल्या शौर्याबद्दल आष्टीचे माजी सरपंच, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी आज पेपर मिल मध्ये जाऊन परवेश सिंग यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. व परवेश सिंग यांचे कौतुक केले.यावेळी शिवसैनिक राजू एडलावार, आष्टीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष बारापात्रे, ग्रा प सदस्य छोटू दुर्गे,रविभाऊ आलचेट्टीवार,मंगेश पोरटे, भास्कर बामनकार, नामु बोरकुटे हजर होते.