वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरु.

106

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरणे सुरु करण्यात आलेले आहेत.

गडचिरोली, (जिमाका) दि.16 : देशात कोविड-19 ची परिस्थिती उद्भभवल्यामुळे सर्व देशभर शासनाद्वारे लॉकडाऊन केल्या गेले होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे बंद करण्यात आले होत्या. शासनाने अद्यापर्यंत शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे सुरु करण्याबाबत कोणत्याही सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. सन 2021-22 या आर्थिक वर्षात शासनाकडून शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात येईल या दृष्टीने तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया सुरु असल्यामुळे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नागपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरणे सुरु करण्यात आलेले आहेत. प्रवेश फॉर्म भरण्याची कोणतीही अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. शासनाकडून वसतिगृह सुरु करण्याच्या सूचना प्राप्त होईल तेव्हा गुणवत्तेचा आधारावर निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

नागपूर शहरातील मुलामुलींचे शासकीय वसतिगृहाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुचना व ज्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी http://gunwanthostel-govt.blogspot.com या ब्लॉगवर किंवा ऑफलाईन फॉर्म शासकीय वसतिगृहामध्ये व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तेव्हा ज्या मुला मुलींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी फॉर्म भरावे असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर चे डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.