शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली 12 गावातील नागरिकांची आलापल्ली उपवनसंरक्षकाकडे मागणी.
आष्टी :- परिसरातील गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली. या नरभक्षक बिबट्याने 15 सप्टेंबरला मनोज देवावार या 6 वर्षीय मुलाला ठार केले.आष्टी पेपर मिल कॉलनीतील 9 वर्षीय मुलास गंभीर जखमी केले.बकऱ्या,कोंबड्याचा तर दररोज फडशा पाडत आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.त्यामुळे पुन्हा मनुष्यहानी टाळण्यासाठी या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज आष्टीचे माजी सरपंच व शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक के. पाठक यांना मार्कण्डा कंसोबा येथे निवेदनाद्वारे देण्यात आला. .तसेच यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहायकाशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून उपवनसंरक्षक श्री पाठक यांच्याशी या विषयावर सवांद साधून देण्यात आला.यावेळी आष्टीच्या सरपंच सौ बेबीताई बुरांडे, मार्कंडा च्या सरपंच सौ वनश्री चापले, चौडमपल्लीचे सरपंच निखिल मडावी, अनखोडा चे उपसरपंच वसंत चौधरी,मार्कंडा चे ग्रा. प. सदस्य विजुभाऊ बहिरेवार, आष्टीचे उपसरपंच सत्यशील डोर्लीकर,ग्रा. प सदस्य संतोष बारापात्रे, विनोद दुर्गे,राजू एडलावार,अंतु तांगडे, दिवाकर मुत्तेवार, दिलीप कर्डेवार,वतीश चहारे, नामु बोरकुटे, बंडू कुबडे,गणेश डोमटवार,राकेश जोरगलवार,सुरेश औतकार,रामकृष्ण नायगमकार,आकाश उराडे, शुभम औतकार, अमोत कुकुडकर, आदी उपस्थित होते.