गडचिरोली जिल्ह्यतील मन हेलावून टाकणारी घटना.
गडचिरोली-
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गर्भवती महिलेला जिल्हा महिला रुग्णालयात उशिरा रेफर केल्याने तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 16 सप्टेंबर ला रात्री दहाच्या सुमारास घडली.या घटनेने जिल्ह्यत एकच खळबळ निर्माण झाली आहे.
भागरथा श्यामराव झाडे रा. कातकल वय 28 वर्ष ता.धानोरा जि. गडचिरोली असे मृतक गर्भवती महिलेचे नाव आहे.तिला धानोरा ग्रामीण रुग्णालयात चार दिवसांपूर्वी भरती करण्यातआले.परंतु डॉक्टरांचा बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे तिच्यावर योग्य उपचार झाले नाही.तीची प्रकृती खालावताच. 16 तारखेला रात्री गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. गडचिरोली येथील महिला रुग्णालयात रात्री दहा वाजता दाखल केले असता तीला मृत घोषित करण्यात आले.मृतक गर्भवती महिलेला रेफर करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधा सुद्धा नव्हती. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील कित्येक गर्भवती महिलांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना सातत्याने घडत आहे.यावरून आरोग्य सुविधेचे जिल्ह्यत काय चित्र आहे याची प्रचिती येते.जिल्हा मुख्यालया पासून 30 किलोमीटर अंतरावर आरोग्य व्यवस्थेची ही दुरावस्था असेल अतिदुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेबाबत न बोललेले बरे.
या दुर्दैवी घटनेने मृतकाच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. या मृतक गर्भवती महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या निष्काळजी व बेजबाबदार असणाऱ्या धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्ट वर कडक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.