गडचिरोली, (जिमाका) दि.२२ : महाराष्ट्र शासनाने संकटग्रस्त पिडीत महिलांना व अनैतिक व्यापरास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने पुरस्कृत उज्वला योजना राज्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना या माहिती द्वारे कळविण्यात येते की उज्वला योजना राबवु इच्छिणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यवक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गडचिरोली कलेक्टर कॉम्प्लेक्स बॅरेक नंबर १ रुम नं २६, २७ गडचिरोली यांचेकडे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सादर करावे.
उज्वला योजना अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे-
संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेमध्ये किमान ५० महिला करिता सुविधा उपलब्ध असावी. संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंधक करणे या विषयातील किमान ५ वर्षे कामाचा अनुभव असावा. संस्थेच्या वार्षिक ताळेबंद किमान २० लाख रुपये असावा. संस्थेच्या नावे किमान १५ लक्ष इतकी रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे.
योजना राबविण्याकरिता इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी सदा संस्थेचे कायमस्वरूपी मुख्यालय किंवा शाखा कार्यालयात त्यात जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. तिनी आयोगाच्या दर्पन पोर्टल नोंदणी नसल्यास संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा तसेच योजना राबविण्याचे निकष दिनांक २७ मार्च २०१८ मधील शासन निर्णयानुसार असावेत.
फक्त प्रतिबंध किंवा सुटका हे घटक राबविण्याऱ्या संस्थांना योजनेअंतर्गत मान्यता देता येणार नाही. उज्वला योजनेच्या दिनांक २७ मार्च २०१८ चा शासन निर्णय तसेच माहिती व नमुना अर्ज शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.
*****