आंतरराज्यीय नाक्यावर लाखो रुपयांची सागवान जप्त

60

◆ वनपरिक्षेत्र कार्यालय सिरोंचा हद्दीतील घटना

सिरोंचा : सकाळी अंदाजे 8.00 वाजता वनऊपज तपासणी नाका चिंतलपल्ली येथे असरअल्ली वरून तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक AP15 TA 0314 ची तपासणी वनरक्षक धुर्वे यांनी केली असता अवैधरीत्या सागवान वाहतूक होत असल्याची खात्री होताच सदर वाहनाला कसून तपासणी केली असता वाहनांमध्ये साग वनोपज आढळून आला. यामध्ये साग छिलपाट -22 नग व साग पाट्या 32 -नग एकून 54 नग=1.997 घ. मी. किंमत रू. 1,40,107/- वाहन किंमत अंदाजे 3,00,000/-रुपये एकूण 4,40,107/-रुपये किमतीचा माल जप्त करून POR No. 8624/215576 दिनांक 24/09/2021 प्रमाणे जे. टी. निमसरकार क्षेत्र सहाय्यक सिरोंचा यांनी गाडी चालक सारय्या नारायण नलबुगा वय 27 वर्षे रा. आसरअल्ली .तह सिरोंचा . जि.गडचिरोली याचे नांवाने जारी केला.
सदर प्रकरणाचा तपास उपवनसंंरक्षक सुमितकुमार (भावसे) सिरोंचा वनविभाग सिरोंचा व बढेकर सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू वनपरिक्षेत्र कार्यालय सिरोंचा व त्यांचे सहकारी करीत आहे . या वरून महाराष्ट्रातील मौल्यवान सागवान तेलंगणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून अवैधरित्या तस्करी होत असल्याचे स्पष्ट होत असून यापूर्वी वनपरिक्षेत्र कार्यालय असरअल्ली व सिरोंचा क्षेत्रातून लाखो रुपयांचे सागवान तस्करी केले असून या प्रकरणातील लोक आजही मोकळेच आहे म्हणून तस्करांनी मध्ये कोणत्याही भीती नसून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे याला जबाबदार कोण असे प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत आहे