गोंदिया रेल्वे स्थानकातून तब्बल दीड वर्षानंतर आज धावल्या तीन लोकल रेल्वे गाड्या:- जेसाभाऊ मोटवाणी माजी नगराध्यक्ष न.प. देसाईगंज यांच्या प्रयत्नांना यश

70

देसाईगंज:- जेसा भाऊ मोटवानी यांनी रेल्वे मंत्री,पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे खासदार व संबंधित अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात अशाप्रकारे जेसाभाऊ मोटवानी माजी नगराध्यक्ष न. प. देसाईगंज यांनी मागणी केली होती व अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले असून सर्वांचे आभार व्यक्त करीत आहेत.

त्याच प्रमाणे आज रेल्वे स्टेशन वर जाऊन रेल्वे चालक यांचा शाल श्रीफळ देऊन हरीश मोटवानी नगरसेवक न. प. देसाईगंज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

मार्च 2020 पासून राज्यात कोरूना ची लाट येताच रेल्वे वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या, मात्र आता कोरोना ची दुसरी लाट असल्याने काही प्रमाणात सुपरफास्ट रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या मात्र लोकल गाड्या बंद असल्याने लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी जेसाभाऊ मोटवानी माजी नगराध्यक्ष न. प. देसाईगंज यांनी रेल्वे विभागाकडे त्याचप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे पालकमंत्री गडचिरोली यांच्याकडे रेटून धरल्याने पूर्व विभागातील गोंदिया जिल्ह्यात देखील गोंदिया-बल्लारशा,गोंदिया-कंटवी व गोंदिया-बालाघाट असे तीन लोकल ट्रेन सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर लोकल ट्रेन सुरू झाल्याचा पहिल्याच दिवस असल्याने काहींचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला आहे त्यानंतर हळूहळू प्रवाशांची संख्या वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
त्यावेळी आरिफ भाई खानानी नगरसेवक न. प. देसाईगंज, शहजादभाई शेख,काँग्रेस शहर अधक्ष पिंकू बावणे, कपिल बोरकर, हिरा चांदेवार, शुभम शिलार,नरेश लिंगायत, गोपाल दिघोरे,आकाश शिउरकर,शुमित मोघरे त्यावेळी उपस्तीत होते…