कोंबड्या केल्या फस्त
चामोर्शी-
आष्टी परिसरात बिबट्याची दहशत अजूनही कायम असून आता तर चक्क आष्टीतील भरवस्तीत या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
15 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास बिबटयाने आष्टीत भरवस्तीत प्रवेश केला. बस स्टॅण्ड परिरातील आलापल्ली रोडवरील वर्गीस अण्णा यांच्या वेल्डिंग दुकानासमोर बिबट्याचा पायाचे ठसे आढळून आले.तसेच वार्ड क्रमांक 3 मधील अशोक ठाकूर यांच्या घरच्या कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे आष्टीतील नागरिक धास्तावले आहे.
14ऑक्टोबरला ला पहाटेच्या सुमारास आष्टी पेपर मिल मध्ये बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. त्यांच्या शोधात मादी बिबट सैरावैरा भरकटत असल्याची दाट शक्यता आहे.आष्टीत रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालणारा हाच मादी बिबट असावा अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.तसेच बस स्टॅण्ड ला लागून असलेल्या पंदिलवार यांच्या घरामोरील परिसरात तीन दिवसापासून रात्रीच्या सुमारास कुत्रे मोठ्या प्रमाणात भुंकत असल्याचे शेजारील नागरिकांना आढळून आल्याने तीन दिवसांपासून तर हा बिबट या परिसरात येत तर नसावा ना? अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
या मादी बिबटया मुळे मानवी व इतर पशु धनाच्या जीविताला धोका असून रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे नागरिकांना जिकरीचे झाले आहे .याची दखल घेऊन वनविभागाने तातडीने या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आष्टी येथील नागरिकांनी केली आहे.