निराधार योजनेचे अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे– प्रहारचे निखील धार्मिक यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

87

आरमोरी:- समाजातील गरीब, अनाथ, निराधार, वृद्ध, दिव्यांग व्यक्ती यांना उपजीविका करण्याचा उद्देशाने शासनाकडून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यात येऊन अनुदान चे मासिक वाटप करण्यात येते परंतु आता 15 दिवसावर दिवाळी येऊनही अजूनही जवळपास 3 ते 4 महिन्याचे अनुदानाचे वाटप करण्यात आले नाही त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळेच या निराधार लोकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे लक्षात येताच काही निराधार लोकांनी धार्मिक यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली तेव्हा प्रहार आरमोरी चे निखील धार्मिक यांनी त्वरित निराधार लोकांना सोबत घेऊन आरमोरी चे मा. तहसीलदार यांना निराधार लोकांचे अनुदान 8 दिवसात दिवाळीपूर्वी देण्यात यावे अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल अश्याप्रकारे चे निवेदन सादर करण्यात आले

यावेळी प्रहारचे निखील धार्मिक , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अमोलभाऊ मारकवार , प्रहार दिव्यांग निराधार संघटनेचे सचिव अनंतभाऊ भोयर ,केवळ दुमाणे ,अजय डोकरे ,ईश्वर खोब्रागडे, हिरापुरे प्रकाश इलमलवर अभिलाष तुपट सुमित्रा गरमले रेवती गरमले शालिनी सपाटे सुनंदा कालबंडे ललिता मने जाईबाई सपाटे व इतर निराधार बांधव उपस्थित होते