रुग्णवाहिका चालकाने स्वतःची जवाबदारी सोडून अपघात ग्रस्तांना सोडून रुग्णवाहिका घेऊन पळाला

104

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी दिला मदतीचा हात

आरमोरी:- आज दिनांक 21/10/2021 ला अंदाजे दुपारी 1=30 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल व अविनाश गेडाम आपल्या चारचाकी वाहनाने गडचिरोली कडे जात होते आरमारी पलीकडे डोंगरगांव जवळ दुचाकी वाहनाने दुचाकी वर बसलेले गडचिरोली तालुक्यातील गोगाव येथील नवीन मेश्राम पिता पुत्र समोरून येणाऱ्या गाडीने कट मारल्याने रोडच्या बाजूला जाऊन पडले त्यात मुलाच्या डोक्याला जबर मार बसला तेवड्यात समोरून चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका गरोदर माता रुग्णाला गडचिरोली येथे सोडून परत आरमारी रोड ने ब्रम्हपुरी कडे जात असताना अपघातग्रस्त जवळ असलेल्या लोकांनी रुग्णवाहिका हाथ देऊन थांबविली त्याच क्षणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम जमाव बघून थांबले रुग्णवाहिच्या चालक सुनील मारवाडे याला अपघातग्रस्तांना आरमोरी रुग्णालयात सोडण्या बद्दल सांगितले व अपघात ग्रस्तांना आनत असतानाच रुग्णवाहिका सुरू करून पळून गेला त्याचक्षणी जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल यांनी मोबाईल करून आरमोरी येथील शिवसेना पदाधिकार्याना माहिती दिली त्यांनी रुग्णवाहिका थांबवून शिवसेना स्टाईल ने ड्रायव्हर ला फटकारले सुरेन्द्र सिंह चंदेल यांनी स्वतची चार चाकी वर अपघातग्स्तांना बसवून आरमोरी रुग्णालयात सोडले व डॉक्टर ला उपचाराची विनंती केली या बाबतची तक्रार चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांना केली व निलंबित करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी केली