गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुरांची अवैध रित्या तस्करी.

84

मुजोर गोतस्करांची गोरक्षकांनाच मारहाण

प्रफुल बिजवे जखमी

गोत्सकरावर कठोर कार्यवाही करण्याची शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांची मागणी

गडचिरोली:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुरांची अवैधरीत्या तस्करी होत एका पिकअप व एक आयशर ट्रक या वाहनातुन बैलांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गडचिरोली येथील गोरक्षकांना मिळताच त्यांनी आपल्या मोपेट टूव्हीलर ने गोतस्करी करणाऱ्या वाहनाचां पाठलाग करून वाहन थांबण्याचा पर्यंत केला. पण वाहन चालकांनी वाहन थांबवले नाही. या वाहनांचा पाठलाग करत ते चंद्रपूर जिल्ह्यतील व्याहाड गेले. त्यावेळी व्याहाड येथे सदर गोतस्करांनी गोरक्षकांना रस्त्यात आडवे होउन बेदम लाठ्या काट्याने मारहाण केली. यात गडचिरोलीतील दोन गोरक्षक गंभीर जखमी झाले आहेत. यातील प्रफुल बीजवे हे गंभीर जखमी असून त्यांच्या वर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सावली पोलिस स्टेशनमध्ये सदर घटने बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपींवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही त्यांना अटक करण्यात आले नाही त्यांच्या वर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. २० ते ३० गुर तस्कऱ्यांनी लाठी, काठ्यांनी व देसी कटा घेऊन यांना बेदम मारहाण केली. या गुर तस्कऱ्यांनी गडचिरोली, चंद्रपूर पोलिसांची भिती नाही. कोणाच्या आशीर्वादाने गोर तस्करी होत आहे ? पोलिस प्रशासन याच्यावर कारवाई का करत नाही? असा प्रश्न गुर रक्षकांनी उपस्थित केला आहे.तसेच या मारहाण करणाऱ्या गोतस्करावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार यांनी केली आहे.