गडचिरोली:- जन अधिकार मंच, गोंडवाना विद्यापीठ, आदिवासी एकता परिषद व नारायण सिंह वुईके यूवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठात सामाजिक संघटना व विद्यापीठ यांच्या परस्पर सहकार्याने “आदिवासी साहित्य संस्कृती व इतिहास” हा कार्यक्रम राबविण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ श्रीनिवास वरखेडी यांनी उत्तम सहकार्य केले. व अशा पद्धतीने जन अधिकार मंच च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम विद्यापीठाच्या सहकार्याने राबविण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाला संधी दिली. या मुळे महाराष्ट्रात विद्यापीठाचे नावलौकिक होण्यास मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली. आणि जन अधिकार मंच चे कौतुक केले. यापुढेही गोंडवाना विद्यापीठ समाजाच्या हितासाठी ज्या ज्या योजना सामाजिक संघटनांच्या सहकार्याने राबविण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वस्त केले. जन अधिकार मंच च्या कार्यकर्त्यांनी देखील जन अधिकार मंच तर्फे दिलेला प्रस्ताव स्विकारल्याबद्दल कुलगुरू प्रा डॉ वरखेडी साहेब यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी जन अधिकार मंच चे मुख्य प्रवर्तक मा रोहीदासजी राऊत, सह प्रवर्तक विलास निंबोरकर, सौ कुसूमताई अलाम, मनोहरराव हेपट, प्राचार्य प्रकाश अर्जूनवार, प्रा. डॉ दिलीप बारसागडे, से नि सहा. पोलिस निरीक्षक मा. हंसराज उंदिरवाडे आदी उपस्थित होते.