मानव उत्थान सेवा समती चंद्रपूर कळून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,दिव्यांग गरजू विद्यार्थ्यांना दिव्यांग सायकल, ब्लॅंकेट्स, नोटबुक, इत्यादी आवश्यक सामग्री वाटप

77

मानव उत्थान सेवा समती चंद्रपूर कळून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,दिव्यांग गरजू विद्यार्थ्यांना दिव्यांग सायकल, ब्लॅंकेट्स, नोटबुक, इत्यादी आवश्यक सामग्री वाटप

चंद्रपूर:- मानव उत्थान सेवा समिती- संस्थापक अध्यक्ष सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने मानव उत्थान सेवा समिती, शाखा-चंद्रपुर प्रभारी महात्मा कांता बाईजि,चंद्रपुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार,श्री भसारकर गटशिक्षणाधिकारी, श्री निब्रड शिक्षण समन्वयक,सौ रघाटाटे मुख्याध्यापिका यांच्या उपस्थितीत दिनांक 17/01/2021 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, यशवंतपुर, चंद्रपुर येथे दिव्यांग गरजु विद्यार्थ्यांना दिव्यांग सायकल,ब्लॅंकेट्स, नोटबुक, बिस्किट्स, मासिक पत्रिका इत्यादी आवश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले. तथपश्चात दिव्यांग विद्यार्थ्यांना, त्यांच्या पाल्यांना, तसेच गरजु गोरगरीब वृद्ध, परिसरातील लोकांना मसाले भात वितरित करण्यात आला.
सदर प्रसंगी श्री आमलेजी, श्री चिडे जी,श्री उघडे जी,श्री पिंपळकर जी,श्री उंडे जी,श्री वरारकरजी,श्री सोमलकरजी, श्री बोढे जी,श्री निलु सिन्हा जी,श्री शिदूरकरजी, श्री खवले जी.संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच
युथ मेंबर तर्फे ज्ञानेश्वर उंडे, अमोल वडस्कर, अन:हद निसाळ,प्रशांत राजनकर,प्रशांत मुसळे,पवन बोढे आदींनी सहकार्य केले.