महाराष्ट्र राज्य महिला आयोग जनसुनावणी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

75

गडचिरोली, (जिमाका) दि.03 :- महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता किंवा पीडीत महिलेला कोणतीही पुर्वसुचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहुन आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडण्याकरीता ” महिला आयोग आपल्या दारी ” या उपक्रमाद्वारे गडचिरोली येथे जनसुनावणी दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे जिल्हयातील महिलांच्या तक्रारीवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

सदर जनसुनावणीस संरक्षण अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस विभाग, समुपदेशन केंद्र यांचे कडून तात्काळ सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. करीता सदर जनसुनावणीस आपल्या लेखी तक्रारीसह उपस्थित रहावे किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय बॅरेक क्र.1, खोली क्र.26,27, जिल्हाधिकारी संकुल कॉम्लेताक्स, गडचिरोली , ई-मेल dwcdgadchiroli.com यावर लेखी तक्रार जनसुनावणी पुर्वीही सादर करता येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली प्रकाश बी. भांदककर यांनी कळविले आहे.