अनुसूचीत जमातीच्या (ST) उमेदवारांकरीता ऑनलाईन स्पर्धापूर्व पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात

57

गडचिरोली,(जिमाका)दि.03:- महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली या कार्यालयाच्या मार्फत अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांकरीता (गट-क व गट-ड) तलाठी /पोलीस /कृषिसेवक /ग्रामसेवक / आरोग्यसेवक/लिपीक- टंकलेखन/ विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ऑफलाईन राबविण्यात येत आहे.

त्यासाठी उमेदवारांनी कार्यालयात आपला अर्ज भरुन देण्याची विनंती आहे उमेदवारांच्या निवडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती बद्दल आपल्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल वर कळविण्यात येईल. प्रशिक्षणासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा, उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधन्य ,उमेदवारांचे वय १८ ते ३७ दरम्यान असावे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.