गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे १८ डिसेंबर पासून बेमुदत कामकाज बंद.. कर्मचारी संघटनेचे सचिव श्री. सतिश पडोळे यांचा इशारा. गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे विभागीय सहसंचालक कार्यालयात साखळी उपोषण

51

                                                                        गडचिरोली :- महाराष्ट्र महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे दि . १६ नोव्हेंबर , २०२१ पासून आंदोलन सुरू असून त्याचाच भाग म्हणून काळी फित आंदोलन , एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला . त्यानंतर दि . १३ व १४ रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयात संघटनेच्या पदाधिकारी यांनी साखळी उपोषण केले.
आश्वासीत प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय शासनाने पुनर्जीवीत करावे, सातव्या वेतन आयोगाच्या ५८ महिण्याच्या फरकाची रक्कम देय करावी , १०-२०-३० लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागु करावी, विद्यापीठीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, गडचिरोली जिल्ह्यातील इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यां प्रमाणे गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ लागू करावा यांच्यासह अन्य महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांकरीता महाराष्ट्र महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून दि . १३ व १४ डिसेंबर रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयापुढे कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण केले.
शासनस्तरावर मागील ३ वर्षापासून प्रलंबित असलेल्या कर्मचा-यांच्या मागण्या, समस्यांच्या संदर्भात संबंधीत खात्याच्या मंत्र्यांना निवेदने देण्यात आले , भेटी – गाठी, सभा झाल्या व संबंधीतांशी बऱ्याचदा चर्चा झाल्या मात्र उदासिन उच्च व तंत्र शिक्षण विभाग कर्मचाऱ्या्च्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे . नैसर्गीक न्यायतत्वाच्या व समानतेच्या आधारे राज्यातील सर्व कर्मचारी यांना समन्यायाची भावना शासनाने घेणे आवश्यक असतांना विद्यापीठीय कर्मचाऱ्याप्रती दुजाभाव करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचावेत व दखल घेवून शासनाने कार्यवाही घ्यावी याअनुषंगाने कर्मचाऱ्यांनी १६ नोव्हेंबरपासून टप्याटप्यात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून आंदोलनाच्या प्रत्येक टप्यात कर्मचारी आक्रमक होवून आंदोलन अधिकाधीक तीव्र करीत आहेत. तथापी अद्यापही शासनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे झोपेच्या सोंगात असलेल्या शासनास जागे करण्याकरीता दि. १८ डिसेंबर, २०२१ पासून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनावर जात आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नागपूर येथील साखळी उपोषणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागपूर व गडचिरोली विद्यापीठाअंतर्गत असलेल्या संलग्नीत महाविद्यालयांतील कर्मचारी यांचेसह गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. मनोजभाऊ जाधव, सचिव श्री. सतिश पडोळे, कोषपाल श्री. प्रविण बुराडे यांचेसह कर्मचारी बहुसंख्येने सहभागी होते. संपामुळे विद्यापीठाचे कामकाज प्रभावीत होवून विद्याथ्यांकरीता निर्माण होणाऱ्या अडचणींना केवळ शासनच जबाबदार राहील अशी माहिती संघटनेचे सचिव श्री . सतिश पडोळे यांनी दिली.