ब्रह्मपुरी :- चंद्रपूर-गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्था र.नं.१०१ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीकरीता सहकार एकता पॅनलचे प्रमुख संजय चहारे,प्रशांत ताेटावार, ज्ञानेश्वर देशमुख, मंगलदास बुराडे यांचे नेतृत्वात १८ पैकी १३ संचालक निवडून आलेत.
चंद्रपूर-गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्था या संस्थेच्या निवडणुकीकरीता १८ जागेपैकी २ जागेवर सहकारी एकता पॅनलचे महिला राखीव गटातुन २ संचालिका अविराेध निवडून आलेत तर उर्वरित १६ जागेकरीता सहकार एकता पॅनलचे १६ उमेदवार व विरोधी गटातर्फे १५ उमेदवार रिंगणात हाेते. रविवारी झालेल्या या निवडणुकीत १६ जागेकरीता १० बुथावर निवडणूक हाेऊन सहकार एकता पॅनलचे १६ पैकीं ११ व विरोधी गटाचे १५ पैकी ५ उमेदवार विजयी झालेत.
कर्मचारी सहकारी एकता पॅनलचे गटातर्फे संजय चहारे,प्रशांत ताेटावार, मंगलदास बुराडे, मंगलदास रापर्तीवार, अवि लांजेवार, रूपेश ठाकरे, सचिन मेश्राम, पद्माकर शेबे,रामदास वांढरे,अशाेक तिजारे,विश्वास वानखेडे व महिला गटातुन याेगीता मत्ते ,वृशाली बाेंडे विजयी झालेत.संस्थेची निवडणूक फारच चुरशीची व प्रतिष्ठेची झाली.
कर्मचारी सहकारी एकता पॅनलचे विजयी उमेदवारांनी यशाचे श्रेय विलास दडाईवार, चंद्रशेखर ताेटावार, अरूण पत्रे, वाळके यांना दिले. कर्मचारी सहकारी एकता पॅनलचे विजयी उमेदवारांचे अभिनंदन पतसंस्थेचे सभासद व बॅकेचे कर्मचारी यांनी केले आहे.