आधारविश्व फाऊंडेशन च्या पुढाकाराने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कुर्ता गाव प्रकाशमय झाला

94

गडचिरोली :- जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त दामरंच्या गावाजवळ असलेला कुर्ता हे गाव इंद्रावती नदीच्या मधोमध वसलेले आहे. म्हणजे इंद्रावती नदीच्या पाण्याचा प्रवाह दोन दिशेने वाहत असून मधोमध बेट निर्माण झाले आहे आणी त्या बेटावरच कुर्ता हे गाव वसलेले आहे. हे गाव ना छत्तीसगड मध्ये येते ना महाराष्ट्रात. या गावी जाण्यासाठी नदीतून डोंग्याने धोकादायक प्रवास करून जावे लागते. आजपर्यंत या गावाची प्रशासनाने देखील दखल घेतली नाही.कुर्ता या गावातील आदिवासी बांधव आजही आदिमानव सारखे जिवन जगत आहे.आता तिथे फक्त्त सहा कुटुंब आहेत.तेही पारंपरिक निसर्गावर अवलंबून असलेली शेती करत आपला उदरनिर्वाह करत आहेत. इथला आदिवासी बांधव मूलभूत गरजापासून वंचित आहे.रस्ते नाही, विद्युत नाही अंगावर घालण्यासाठी योग्य कपडे नाही. एवढेच नाही तर ते गाव ना महाराष्ट्रात येते ना छत्तीसगड मध्ये त्यामुळे त्यांच्या कडे आधारकार्ड, रेशनकार्ड सुधा नाहीत. त्यांची घरे गवताची असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात त्यांची परिस्थिती विचार करण्याच्या पलीकडे असते.आपला भारत देश स्वतंत्र होऊन 72 वर्षे झालीत तरी अजूनपर्यंत या गावी विकासाचे किरण पोहोचू नये विचार करण्यासारखे आहे.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली, निस्वार्थी भावनेने काम करणारी, गरजूंसाठी धावून जाणारी गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव तेही महिलांची असलेली संस्था आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांना 15-20 दिवसापूर्वी कुर्ता या गावाच्या परिस्थिती बद्दल माहिती मिळाली.आणी त्यांना सोलर लॅम्प आणी ताडपत्री ची खूप गरज असे कळल्यावर त्यांनी लगेच आपल्या फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.आणी फाऊंडेशन सर्व सदस्यांनी आपापल्या परीने शक्य झाली तशी मदत केली.अश्याप्रकारे 12 डिसेंबर रोज रविवारला आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे, सचिव सुनीता साळवे, सदस्या विजया मने, मंजू क्रीष्णापूरकर, वनिता विंगम, आरती सरोदे यांनी प्रत्यक्ष नावेतून धोकादायक प्रवास करून त्या गावातील लोकांना ताडपत्री, सोलर लॅम्प, कपडे, ब्लँकेट, स्वेटर, भांडे, फराळ वितरित केले.तिथे प्रत्यक्ष गेल्यावरच तिथली परिस्थिती कळते. एक नुकतीच बाळंतीण झालेली महिला होती. तिला स्वेटर सुधा घालायला नव्हते. तिच्या बाळाच्या अंगावर सुद्धा कपडे नव्हते.इतकी भयाण परिस्थिती आहे.तेथील एका वयस्क व्यक्तीशी बोलल्या नंतर कळले की ते 50 वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहे.या गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी कुर्ता या गावातील जनतेला आश्वासन दिले. तसेच या गावाचे पुनर्वसन तरी करावे नाहीतर तिथे सुविधा तरी पुरवाव्या याची माहिती मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री व मा. राज्यपालांना निवेदन देण्यात येईल व पाठपुरावा करण्यात येईल. कुण्या सामाजिक दानशूर लोकांना किंवा संस्थांना मदत करायची असेल तर आधारविश्व फाऊंडेशन सोबत संपर्क करावा.या कार्यासाठी प्रीती म्हस्के, विद्या कुमरे, लता वाईलकर, डॉ. नूतन देव, ममता कादवे, लीला डांगे, विना जंबेवार, अरुंधती नाथानी, स्नेहा आखाडे, शहनाज शेख, ममता जाधव, संजीवनी गेडेकर, दीप्ती वैद्य,प्रिया निशाणे,मीरा कोलते, अंजली देशमुख,नदीम नाथानी, भामरे सर, पुष्पा देवकुले,पुष्पा श्रीरामे, स्वाती खांडरे, मीनल हेमके, यांचे मोलाचे सहकार्य लाभले