गडचिरोली :- जिल्हा असोसिएशनचे आवाहन महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये लेबॉरेटरी करीता नवीन नियमावली जाहिर केली होती. पॅरामेडिकल कॉन्सीलच्या माध्यमातून नोंदणीकृत लॅब मधूनच रक्त व अन्य प्रकारच्या तपासण्या करण्याचे आदेश निर्गमीत केले होते. या आदेशाचे पालन करीत गडचिरोली जिल्ह्यातील प्रमोद पळशिकर, संजय चन्नावार, सत्यविजय मेश्राम, नदीम शेख, तुषार चोपकर, प्रेमानंद सोनटक्के, पल्लवी बांबोळे, पोर्ला येथील देवेन्द्र खरवडे, नवेगाव येथील मनोज दुधबळे, वडसा येथील अर्जुन स्वर्णकार, ज्ञानेश्वर पगाडे, चामोर्शी येथील मेघराज देशमुख, रमन दुर्ग, शुभम कोसमशिले, वृशाली मोगरकर, प्रगती गव्हारे, आलापल्ली येथील श्रृतीका पेम्पकवार, दुलाल दास, येनापूर येथील राहूल उपरे, आष्टी येथील प्रशांत बिश्वास, राजू भडके, अहेरी येथील फहीम हकीम, मुलचेरा येथील समीर मंडल यांचे सह अन्य ३४ लॅब चालकांनी आपल्या लॅबला नोंदणीकृत केले आहे. या प्रयोगशाळेच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रयोगशाळेत कुठल्याही प्रकारची तपासणी न करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा लॅब असोसिएशनने रविवार ला आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.
कोरोना काळात सलग दोन वर्ष शासनाने अवैध पॅथालॉजी लॅब धारकांच्या विरोधात कारवाई चे सत्र सुरू केले होते. यादरम्यान अवैध पॅथालॉजी लॅबच्या विरोधात कारवाई करण्याच्या संदर्भाने माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्याने अवैध लॅब धारकांचे धाबे दणाणले होते. याचा फटका काही वैध पॅथालॉजी लॅब धारकांनाही बसला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. डॉक्टरांनी सुद्धा पॅथालॉजी लॅबचे रिपोर्टस स्वीकारतांना सदर लॅब पॅरामेडिकल कॉन्सीलकडून नोंदणी केलेली आहे याची सहनिसा करूनच रिपोर्ट स्वीकारावे असे आवाहन जिल्हा लॅब असोसिएशनने केले आहे. नवीन नियमावलीनुसार पॅथालॉजी लॅबची अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३४ लॅब धारकांनी आपली लॅब नोंदणीकृत केली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ९, कुरखेड़ा तालुक्यातील ३ देसाईगंज ५, आरमोरी ४, धानोरा १, चामोर्शी ७, मुलचेरा १, अहेरी १, आलापल्ली २ आणि एटापल्ली मध्ये १ अधिकृत लॅब आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अनधिकृत लॅब मधून विविध प्रकारची तपासणी केली जात असल्याचा आरोपही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
यावेळी असोसिएशनचे प्रमोद पळशीकर, फहीम हकीत, मेघराज देशमुख, पगाडे, स्वर्णकार, नदिम शेख, संजय चन्नावार, तुषार चोपकर, सत्यविजय मेश्राम, दुलाल दास, समर्थ मंडल, दया हलदार, मनोज दुधबळे, राजु भडके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.