युवारंग तर्फे आरमोरीतील हास्यविनोद लघुचित्रपट बनविणाऱ्या वाईन्स ऑफ गण्या टीम चा सत्कार

63

आरमोरी :- कोव्हिड च्या परिस्थितीत सर्वत्र निराशेचे व तणावाचे वातावरण असताना आरमोरी शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन हास्यविनोद लघुचित्रपट बनवायचा विचार केला मात्र अद्यायावत संसाधनाच्या अभावाने व आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना खुप अडचणीला सामोर जाव लागलं पण याही विषम परिस्थितीत ही या युवकांनी हिंमत न हारता आपल्या कामात सातत्य ठेऊन मेहनत, जिद्द ,चिकाटी ,च्या बळावर मात्र ३ वर्षात खुपच अल्प वेळात आपल्या हास्यविनोदी लघुचित्रपटांनी हजारो लोकांची मने जिंकत समाजात आपलं एक स्थान निर्माण केला आज आरमोरी शहरातील नागरिकांकडून या युवकांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातील युवकांनी हे नावीन्य कार्य करत या क्षेत्रात जाऊन आरमोरी शहराचा नाव उंचावला त्याबद्दल युवारंग तर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा , पुष्पगुच्छ व अल्प रोख देऊन या टीमचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी *युवारंग क्लब चे अध्यक्ष राहुल जुआरे, कोषाध्यक्ष प्रफुल खापरे, संघटक नेपचंद्र पेलणे,सुरज पडोळे, युवारंग चे सदस्य प्रशांत सोरते ,रोहित बावनकर, अभिषेक जुआरे,श्रीराम ठाकरे,जाँन्टी मेश्राम साहिल पंडेलगोत वाईन्स ऑफ गण्या टीम चे

लेखक व दिग्दर्शक, एडिटिंग- गणेश कोल्हे
कॅमेरामँन – गणेश कोल्हे , पंकज इंदुरकर
अभिनेता – गौतम बारसागडे, नाफीस शेख, साईनाथ गेडाम, गणेश कोल्हे, पंकज इंदूरकर, संदीप ठाकरे, गुरुदेव कोल्हे उपस्थित होते याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना
वाईन्स ऑफ गण्या च्या टीम ने सामाजिक जनजागृती चे लघुचित्रपट बनवुन समाज जागृती करून आपल्या वर असलेले समाजाचे ऋण फेडावे असे विचार व्यक्त केले .