जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!
📝मुलचेरा:- तालुक्यातील ग्रामपंचायत कोटारी अंतर्गत बंदुकपल्ली येते माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,गांवात माता मंदिर होता.मात्र लाकडा पासून तयार केले होते,प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्वप्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चाना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडत असतात..!!
मात्र माता मंदिर व्यवस्थित नसल्याने बंदुकपल्ली येतील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असतात जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी शासनाकडून माता मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होत नाही.मात्र मी माझ्या स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले व बांधकाम हि पूर्ण झाले असल्याने आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पूजा अर्चना करून रितसर उदघाटन करण्यात आले..!!
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणी कुसनाके ग्रा.प.कोठारी सरपंच,चलावार काका,ग्रा.प. सरपंच तेलामी,साधना मडावी ग्रा.प.चुटुगुंटा उपसरपंच सुरेश आत्राम,व्यकटेश धनोरकर,जीवनकला तलांडे ग्रा.प.सदस्य,अडपल्ली ग्रा.प.माजी उपसरपंच निमसरकार ताई,पोलीस पाटील मडावी,कालिदास भाऊ,मुलाचेरा चे नगरसेविका कुसनाके,विनोद झाडे,प्रभास भाऊ,बंडुभाऊ आलाम ,कमलेश भाऊ,तसेच समस्त गावकरी नागरीक उपस्तीत..!!