आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी लवकरच ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीची बैठक
आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या सह आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संयुक्तपणे स्वीकारले
महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपग
गडचिरोली:- महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने आदिवासी समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या कमिटीची बैठक होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.*,यावेळी आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाने विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या कक्षात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले,यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून या कमिटीच्या नियमित बैठका न होणे ही अत्यंत दुखद आहे. आपण ही बाब राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली असून लवकरच या कमिटीची बैठक होईल असे आश्वासन मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.