शासन व प्रशासनाचा व्यापारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध, जडवाहतुकीमुळे निर्माण समस्यांचे निराकरण न झाल्यास 12 सप्टेंबर पासून बेमुदत बंदचा ईशारा.

136

शासन व प्रशासनाचा व्यापारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध, जडवाहतुकीमुळे निर्माण समस्यांचे निराकरण न झाल्यास 12 सप्टेंबर पासून बेमुदत बंदचा ईशारा.

गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्पातून असलेला लोहयुक्त असलेला चुरा, दगड सूरजागड येथून मोठमोठ्या वाहनांद्वारे आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरून नेणे सुरू आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे आलापल्ली ते आष्टी पर्यंतचा संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर

मोठ-मोठे खड्डांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने लोहयुक्त दगड व चूराच्या वाहतूकीमुळे निर्माण झालेल्या समस्याचे निराकरण करावे अशी मागनी आलापल्ली व्यापारी संघटनेच्या वतीने 29 ऑगस्ट 2022 शासन प्रशासनला निवेदन देऊन करण्यात आली होती. मात्र शासन व प्रशासनासोबत वारंवार पाठपुरावा व पत्रव्यवहार करूनही जडवाहतुकीमुळेनिर्माण

समस्या जैसे थेच आहे .

ह्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी आलापल्ली व्यापारी संघटनेच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी आलापल्ली येथेच चक्का जाम चा ईशारा देण्यात आला होता. मात्र, शासन व प्रशासनाने कंपनीच्या दबावाखाली येऊन जनआंदोलन दडपण्यासाठी 8 सप्टेबर ते 22 सप्टेंबर पर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे उचीत मागण्यांसाठी असलेले जनआंदोलन दडपण्यासाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी 8 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यत जारी केलेले जमावबंदी चे आदेश अन्यायकारक आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाचा निषेध म्हणून आलापल्ली येथील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने 12 सप्टेंबर पासून बेमुदत बंद ठेवण्यात येण्याचा ईशारा देण्यात येत आहे.

जडवाहनांच्या आवागमनामुळे आलापल्लीते आष्टी पर्यंत धुळीचे लोट निर्माण होऊन प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. खराब रस्त्यांमुळे शाळकरी विद्यार्थ्याना शाळेत जाने मुश्कील झाले आहे. अनेक विद्यार्थ्याचे शाळेत जाणे बंद झाले आहे आलापल्ली से आष्टी पर्यतचा प्रवास जिव मुठीत घेऊन करावा लागत आहे एटापल्ली ते आष्टी पर्यत जडवाहानाच्या वाहतुकीमुळे वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावर अनेकदा

जीवघेणे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे हे जिल्हाधिकारी साहेबांना शासन व प्रशासनाला दिसत नाही काय? जनतेला समस्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाचे अधिकारी काय करत आहेत ?असा प्रश्न आम्ही व्यापारी वर्ग विचारतो आहे

शासन व प्रशासनाचे काम जनतेला समस्या सोडविण्यासाठी असते त्यामुळे व्यापारी संघटनेला आंदोलनाचा धसका प्रशासनाने घेतला आहे त्यामुळेच जमावबंदी चे कलम जारी करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 12 सप्टेंबर पासुन आलापल्ली परिसरातील व्यापारी वर्ग आपली दुकाने बेमुदत बंद ठेऊन शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध करीत आहो.

येत्या काळात मोठ्या जनआंदोलनाचा इशाराही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात येत आहे.