आलापल्ली येथे वनविभागाच्या विश्रामगृहात व्यापारी आंदोलना बाबत घेतला आढावा. खा.अशोकजी नेते.

41

आलापल्ली येथे वनविभागाच्या विश्रामगृहात व्यापारी आंदोलना बाबत घेतला आढावा. खा.अशोकजी नेते.

 

व्यापारी वर्गानी सुरजागड प्रकल्पाबाबत रोष व्यक्त करित मांडल्या समस्या

 

*व्यापारच्या समस्या संदर्भात अडीअडचणी जाणून घेऊन तोडगाा काढण्या संबंधित खा.अशोकजी नेते यांनी केले मार्गदर्शन*….

 

दिं.१४ सप्टेंबर ०२२

 

आलापल्ली:- आलापल्ली येथे दोन तीन दिवसापासून व्यापारीने आंदोलन ठेवलाय या संदर्भात व्यापाऱ्यांशी चर्चा करुन खा.अशोकजी नेते व स्थानिक आम.मा.धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यापाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा घेतला.

 

सुरजागड प्रकल्पातील (ट्रक) वाहनाच्या रहदारीमुळे धुळीचे साम्राज्य वाढले असून नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या धुळीमुळे व्यापाऱ्यांच्या अनेक दुकानांमध्ये धूळ बसून दुकानातील असलेल्या मालाची सुध्दा खराबी होत आहे. तसेच ट्रकच्या रहदारीमुळे रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघात होणे हेसुद्धा नाकारता येत नाही. याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.

 

व्यापारी संबंधित प्रमुख मागण्या खालील प्रमाणे…

१) बायपास रस्ता ३ महिण्यात तयार करावा.

(२) बायपास रस्ता तयार होईपर्यंत सुरजागड येथील ट्रक रात्री १०.०० ते सकाळी ५.०० पर्यंतच सुरू ठेवावे.

(येणे जाने दोन्ही फक्त रात्री सुरू ठेवावे.)

३) सर्व गाडया क्षमतेनुसार भरावे (अंडरलोड)

सुरजागड पहाडावरील उत्खनन केलेले लोहयुक्त दगडचुरा जडवाहनाने वाहतुक करून एटापल्ली ते आलापल्ली वाहतूक होत असल्याने जनतेला होणाऱ्या त्रासाचे,समस्याचे निराकरण करण्यात यावे.

 

आलापल्ली रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. यात सर्व लोड वाहनाचे व्यापारांच्या दुकानात उडतो. त्यामुळे दुकानाचे अतोनात नुकसान होत आहे.

 

तसेच शाळाकरी मुले मोटरसायकल घेऊन चालण्याने भितीमय वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे मुले, हायस्कूल, महाविद्यालय, अंगणवाडी,इंग्रजी माध्यम शाळा, आणि आय टी आय मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी आलापल्ली से चंद्रपूर मेन रोड राज्य महामार्गाचा उपयोग करावा लागतो. या मार्गावर जाने येणे करिता जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो.

 

व्यापाऱ्यांच्या या सर्व समस्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिनांक १६ सप्टेंबर ०२२ ला कलेक्टर ऑफिस येथे समस्येचे निराकरण करण्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन खा.अशोकजी नेते यांनी बैठकी संबंधित समस्याचे निराकरण व प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासित केले.

 

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते,गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु‌.जनजाती मोर्चा, आमदार धर्मराव बाबा आत्राम, विनोद आकंपलिवार, सागर डेकाटे, संदीप कोरेत, सरपंच साहेब, तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, शेकडोच्या संख्येने अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.