स्वाभिमानी गणेश मंडळ, मुरखळा चक च्या वतीने हनुमान मंदिराच्या सभागृहात सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली होती. यात प्रबुद्ध हायस्कूलच्या वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी तसेच वर्ग ११ व १२ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
१० वी पर्यंत चा शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे बद्दल काहीही माहिती नसते .
गडचिरोली:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हायस्कूल चा शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षे विषयी योग्य मार्गदर्शन मिळाला तर समोर जाऊन विद्यार्थांना कोचिंग क्लासेस लाऊन आई – वडिलांचा पैसा खर्च करावा लागणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा ग्रॅज्युएशन , पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हणुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात यश मिळत नाही.
म्हणुन निखिल वासुदेव कुकडकार आणि प्रणिल तुमदेव कुकडकार यांच्या पुढाकाराने गणेश उत्सवानिमित्त ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चालना मिळावी आणि कमी वयात असतांनाच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी अशी आशा बाळगून असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले .
यात विद्यार्थांना दोन गटांमध्ये विभागणी करून स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या हिरगिरीने यात भाग घेतला .त्यानंतर दिनांक 9 सप्टेंबर रोजी प्रबुध्द हायस्कूलच्या प्रांगणात उत्कृष्ट विद्यार्थ्यांकरिता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री अशोक कृ.टिचकुले सर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री कुडवे सर, श्री बोधे सर, श्री येलमुले सर, श्री. दुधे सर , श्री. रामटेके सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री एम जेलवार, श्री वासेकर, श्रीमती बांबोळे जी व स्वाभिमान गणेश मंडळाचे प्रा. प्रणिल कुकडकार व मुंबई अभियांत्रिकीचे विद्यार्थी निखिल कुकडकार, पंकज पिठले, व अन्य सदस्य गण उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले व स्पर्धकांन कडून कोणत्याही प्रकारची परीक्षा फी घेण्यात आली नाही आणि बक्षीस म्हणुन स्पर्धकांना पैसे न देता त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात आली जेणेकरून विद्यार्थी कमी वयापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतील असे मत सामान्य ज्ञाने स्पर्धेचे आयोजक निखिल वासुदेव कुकडकार आणि प्रणिल तुमदेव कुकडकार यांनी मांडले.