गोशाला चालविणारे ‘ प्रदिप महाजन यांची ‘ गाय ‘ वाघाने केली फस्त
गडचिरोली – . गडचिरोली ते गुरवळा रोड , गडचिरोली वरुन अवध्या अर्धा कि . मी . अंतरावर रोडच्या दोनसे फुट अंतरावरील झुडपात प्रदिप महाजन यांची गिर .जातीची तगडी गाय वाघाने फस्त केली . लाल रंगाची गाबन असलेली तगडी गायीचा एक पाय व नरडीची भाग वाघानी खाल्ला . सदर गाय गुरुवार सांयकाळ पासुन लापत्ता होती . महाजन वाकडी ‘ गुरवळा ‘ हिरापूर या गावात शोधा शोध करीत होता . आज दि. १८ सकाळी ६ . वाजता कावळ्यांच्या ओरडण्यावरून गायीचा पत्ता लागला . विस पंचविस हजाराची गिर .जातीची गाय पूढील महिन्या पासुन १० लिटर दुध देणारी होती . आता माझे एक लाखाच्या दुधाची इंकम गेली असे ठाकरे बाबु सांगत होते . नुकसान भरपाई मिळवी म्हणुन वन विभागाचे R Fo भडके व वनपाल नवघडे यांचेकडे तक्रार करण्यात आली असुन अधिक चौकशी सुरु आहे . नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आहे . पुल कलं ,नगरी व आता गुरवळा रोड ‘ अश्या विविध ठिकाणी गोशाला चालविणारे समाज सेवक प्रदिप महाजन गुरवळा रोड , शाहुनगर शेवटचे घर असुन आजही त्यांचा कडे चार पाच गायी आहेत . गोशाला चालविणारा ‘ गायीचे प्राण वाचविणार्या व्यकीची गाय वाघाने ठार केली हे विशेष . महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी वाघाने गायीला ठार मारले त्या रोडवर . रामनगर ‘ शाहुनगर च्या २० महिला मार्निग वॉकसाठी जातात व त्या ठिकाणी बसुन व्यायाम करतात सकाळीच . म्हणजेच वाघाने सांयकाळी .७ च्या सुमारास गायीला ठार मारले . त्याच्या पूढे २ कि.मी. अंतरावर वनविभागाचे कॅमेरे लावले आहेत . गाय जंगलात चराईला गेली असावी . वाघाने कॅमेरा चुकवून पुढे अर्ध्या कि मी . अंतरावर गायीला ठार केले . हिरापूर – वाकडी भागात वाघाने यापूर्वी सुध्दा गाय बैल ठार मारले होते . गुरवळा – विहीरगाव रोड कडे सकाळी व सांयकाळी १०० च्या जवळ्यास वॉकींग करण्याकरीता रामनगर वासीय जातात . परंतु अजुनपर्यंत मनुष्य हानी झाली नाही . अनेकांना वाघाचे पंजे पाहायला मिळतात . सदर ठार केलेल्या गायीला अवती भोवती वाघाचे पंजे स्पष्ट दिसत आहेत . यावरून वाघाने गायीला ठार मारले यावरून स्पष्ट होते . बघुया वनविभाग कोणती कारवाई करतो ते बातमी लिही पर्यत वनविभागाचे कोणतेच अधिकारी घटना स्थळावर पोहचले नव्हते .