कुसुम ताई अलाम आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित
नागपुर :- आदिवासी विकास विभाग नागपूर यांचे वतीने वनामती येथे महाराणी दुर्गावती जयंतीचे औचित्य साधून नागपूर विभागातील वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आदिवासी महिलांना आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार्थी प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या आपले कार्य निर्भिड पणे करत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे. इतिहासात यहामोगीने धान्याचा शोध लावला, जंगोरायताड ही समाजकार्यकर्ती होऊन गेली. ज्या पारी कुपार लिंगो ने व्यवस्था निर्माण केली त्यांची ती मार्गदर्शक होती. अशा समाजातील महिला आज नव्वद टक्के कुपोषित आहेत, त्यांचे शिक्षणाचे प्रमाण, आर्थिक स्थिती, सामाजिक, राजकीय यासाठी शासनाने विशेष काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाला आपण हे कळवावे असे या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आदिवासी समाजातील महिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती ठाकरे होत्या.प्रमुख पाहुणे मा मायाताई ईवनाते सदस्य अनु जमाती आयोग तथा माजी महापौर नागपूर,श्रीमती गिरी मॅडम सह. आयुक्त जात पडताळणी,प्रा.सुमित्राताई टेकाम,मा.संध्याताई किलनाके अभियंता दूरदर्शन नागपूर ,रेखाताई जुगनाके, गिरीजाताई ऊईके, शांताताई कुमरे जि प सदस्य तथा झुंड सिनेमा कलाकार. अनेक जिल्हयातील मान्यवर महिला, आदिवासी विकास विभागातील महिला कर्मचारी, अधिकारी यांनी अतिशय मेहनतीने हा कार्यक्रम घडवून आणला. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासात प्रथमच असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने विभागप्रमुख मा रविंद्र ठाकरे सर आयुक्त यांचे सर्वांनी भरभरून आभार मानले.