चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडली 7 गाड्यासह जवळपास 2 हजार पेटी दारू

194

चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडली 7 गाड्यासह जवळपास 2 हजार पेटी दारू

जिल्ह्यातील दारूबंदी फक्त कागदोपत्री

चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडल्या दारू ने भरलेल्या 7 गाड्या

चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांना अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती कळली. नागपूर मार्गे शहरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 7 चारचाकी वाहनांचा ताफा दाखल होत होता, मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी जीवाची पर्वा न करीत अवैध दारू विक्रेत्यांच्या वाहनांवर हल्लाबोल केला व 7 वाहन जप्त करीत पडोली पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. 7 वाहनांमध्ये 1 वाहन हे पायलट गाडी होती, त्याच काम शहरात जाण्याचा मार्ग सुरळीत करून सावधान करणे होते. 6 वाहनात एकूण जवळपास 2 हजार पेटी दारू व चारचाकी वाहने असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळी पडोली पोलीस स्टेशनमध्ये आमदार जोरगेवार व त्यांच्या समर्थकांशिवाय चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे सुद्धा उपस्थित होते.
सक्रिय जनप्रतिनिधी म्हणून आमदार जोरगेवार यांनी आपली भूमिका दाखवीत अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्याला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अवैध व्यवसाय चालू देणार नाही असा इशारा दिला.