बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गौरव बाला यांच्या पाठपुराव्याला यश.

44

बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गौरव बाला यांच्या पाठपुराव्याला यश.

 

मूलचेरा नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर

 

गडचिरोली-

जिल्ह्यतील मूलचेरा नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामुळे मूलचेरा नगरपंचायत क्षेत्राच्या विकास कार्याला गती प्राप्त होणार आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख श्री किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख गौरव बाला यांनी मूलचेरा नगरपंचायतीच्या विकासाचा ध्यास घेऊन वेळोवेळी विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास विभाग असल्याने त्यांनी या विकास कामांसाठी तात्काळ एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.यामुळे मूलचेरा नगरपंचायत क्षेत्राच्या विकासाचा चेहरामोहरा बदलणार असून पायाभूत विकासकामांना गती प्राप्त होणार आहे.मूलचेरा नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यचे तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्री किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या नेतृत्वात शिवसेनेने भरीव यश संपादन करीत सत्ता प्राप्त केली.मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत मूलचेरा नगरपंचायतीला भरीव निधी मंजूर करून मुख्यमंत्र्यांनी विकासाचे दिलेले वचन पाळले आहे.

 

एक कोटी रुपयांच्या निधीतून विकास कामांना सुरवात झाली असून मूलचेरा नगरपंचायत क्षेत्राच्या प्रभाग क्रमांक 17 मधील श्री मल्ला बंडावार ते मधुकर तुकंलवार यांच्या घरापर्यंत आठ लाख छत्तीस हजार रुपये किमतीच्या सिमेंट रस्त्याचे भूमीपूज दिनांक 4 नोव्हेंबर शुक्रवारी नगराध्यक्ष श्री विकास नैताम यांच्या हस्ते पडले. यावेळी मूलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, न. प. उपाध्यक्ष मधुकर वेलादी, न. प. महिला बालकल्याण सभापती सौ. मोहनाताई परचाके, पाणी पुरवठा सभापती सौ. सुनीता कोकेरवार,नगरसेविका सौ.सपना सपना मडावी, नगरसेविका सौ. जास्वंदा गोंगले, नगरसेविका सौ यामीना हिवरकर, नगरसेवक काशिनाथ कन्नाके, नगरसेवक विजय कुलमेथे,नगरसेवक देवा चौधरी, सौ. मनीषा गेडाम, सौ. मंगला आलाम,दीपक बिश्वास, उत्तम बिश्वास, सखाराम दिवटीवार,प्रभाकर येलमुले,रवी झाडे, संदीप रतनपुरे,गणपत मडावी, सुनील बावणे, देविदास परचाके,संदीप कोन्ड्रावार,व मूलचेरा नगरपंचायतीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गौरव बाला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे गडचिरोली जिल्ह्यबद्दल विशेष जिव्हाळा असून विकासकामासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी हमी त्यांनी दिल्याचे सांगितले. येणाऱ्या काळात पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख श्री किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात आपण मूलचेरा नगरपंचायत व तालुक्याच्या विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करणार असून मूलचेरा तालुक्याला विकासाची एक नवी दृष्टी देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.