ग्रामोदय संघाच्या माध्यमातून भद्रावती चे नाव जागतिक नकाशावर आणू – नितीन गडकरी

80

ग्रामोदय संघाच्या माध्यमातून भद्रावती चे नाव जागतिक नकाशावर आणू – नितीन गडकरी

भद्रावती – येथील ग्रामोदय संघात लाल माती द्वारे तयार होणाऱ्या भांड्याचे जागतिक स्तरावर ओळख करून देऊन भद्रावती चे नाव जगाच्या नकाशावर आणि त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करणार अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी दिली.
गोमादय संघात आयोजित खादी आणि ग्रामोद्योग स्फुर्ती योजना अंतर्गत कामगार सशक्तिकरण चर्चा आणि पंतप्रधान रोजगार योजना जागरुकता अभियानाअंतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते 1956 ला स्थापन झालेले या ग्रामोदय संघात वेळेनुसार जो बदल व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही अशा ही परिस्थिती येथील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तो जिवंत ठेवला तो भूषनावर आहे या संघाला स्फुर्ती योजनेअंतर्गत एक कोटी 80 लाख मिळाले या माध्यमातून त्यांनी चंद्रपूर-गडचिरोली ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना याठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी प्रशिक्षण घेतल्यानंतर कित्येक जणांना रोजगार मिळणार यावर योजनेचे फलित आहे. ग्रामोदय संघाची एकूण आठ एकर जागा आहे या जागेचे मास्टर प्लान बनवून माझ्याकडे पाठवावा जेणेकरून भविष्यात त्यात फेरबदल करण्याचा प्रश्‍न राहणार नाही या करीता मी मदत करेल ग्रामोदय संघाच्या जीर्ण झालेल्या इमारती व प्रशिक्षणार्याच्या वसतिगृहासाठी 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवण्यासाठी मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विजय कुमार सक्सेना, एल कें शर्मा विलास लांडे ग्रामोदय संघाचे अध्यक्ष जितेंद्रकुमार , दत्तू गुंडावार उपस्थित होते यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे के शर्मा यांनी सध्याच्या आणि पुढील वाटचालीची माहिती दिली.
तत्पूर्वी चे संचालक कृष्णमूर्ती मीरमीरा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्याठिकाणी प्रशिक्षणार्थी काम करीत असलेल्या कामाची पाहणी केली कार्यक्रमाचे संचालन विजय कुमार श्रीवास्तव तर आभार जितेंद्र कुमार यांनी केले यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, माजी नगराध्यक्ष सुनील नामदार . विजय वानखेडे चंद्रकांत गुंडावार ,माजी नगराध्यक्ष संजय वासेकर नगरसेवक प्रशांत डाखरे आदी उपस्थित होते.