वनहक्काचे पट्टे मिळालेल्या सात बारा धारकांचे धान खरेदी करा अन्यथा धानाच्या पोत्यासहीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचा इशारा
गडचिरोली: वनहक्काचे पट्टे मिळालेल्या सातबारा धारकांचे धान खरेदी करावे अन्यथा धानाच्या पोत्यासहीत शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी पत्रकाद्वारे दिला.
खरीप पावसाळी हंगामातील शेतकऱयांच्या धानाची मळणी होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी लोटला परंतु ज्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून वनपट्टे मिळाले आहे. त्या शेतकऱ्यांचे धान अजूनही आदिवासी महामंडळ अंर्गत सोसायटीने धान खरेदी केलेली नाही.धान खरेदी केंद्रावर धान विकण्यासाठी गेले असता केंद्रातून त्यांना वापस पाठविण्यात जाते.
धान न विकल्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर ताण पडला आहे. त्यांचे सर्व व्यवहार ठप्प पडलेले आहेत.ज्यांचे शेतकऱ्यावर पैसे थकीत आहेत ते वसुलीचा तगादा लावत आहेत.पट्टे धारक शेकडो शेतकरयांनी माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांची भेट घेऊन पट्टे धारकांची समस्या सांगितली.
मुला मुलींचे लग्न,शिक्षण, आजारपण व अनेक कामासाठी पैसा हवा आहे.मात्र आदिवासी महामंडळ प्रशासनाने तुघलकी निर्णय लादून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे.येत्या दहा दिवसांत वनहक्क पट्टेधारकांचे धान खरेदी न केल्यास धानाच्या पोत्यासह ट्रॅकटर ट्राली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल.जोपर्यंत शासन धान खरेदी करण्याचे आदेश देणार नाही तोपर्यंत हटणार नाही.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असाही इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी दिला आहे.