देसाईगंज तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रस्तापितांना दे धक्का तब्बल 17 ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता

113

देसाईगंज तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रस्तापितांना दे धक्का

तब्बल 17 ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ताΓ

देसाईगंज-ता.प्र:-
तालुक्यात पहिल्या टप्प्यात दि.15 जानेवारी 2021 रोजी पार पडलेल्या 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे आज पार पडलेल्या मतमोजणीच्या निकालात तब्बल अनेक वर्षानंतर धक्कादायक निकाल लागले असुन तालुक्यातील तब्बल 17 पैकी 17 ही ग्रामपंचायतींवर महाविकास विकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याने प्रस्तापितांना हा चांगलाच दे धक्का मानल्या जाऊ लागला आहे. यामुळे माञ तालुक्याच्या राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
देसाईगंज तालुक्यातील बोळधा,चोप,शंकरपुर, कसारी,विहीरगाव,पोटगाव, पिंपळगाव (ह.),डोंगरगाव (ह.),किन्हाळा/मोहटोला, शिवराजपुर,विसोरा,आमगाव एकलपुर,कोकडी, तुळशी, कुरूड,कोंढाळा या ग्रामपंचायतीचे यावेळी धक्कादायक निकाल समोर आले असुन तालुक्यातील विद्यमान आमदार यांचे दत्तक गाव आमगाव,स्व:गाव पोटगाव येथील खांदेपालट करत महाविकास आघाडीने उसंडी मारल्याने एकुणच विद्यमान आमदारांसाठी ही धोक्याची घंटा मानल्या जाऊ लागली आहे.दरम्यान विसोरा या भाजपाच्या गडातच महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनेलने तब्बल 13 पैकी 12 जागांवर विजयी पताका फडकवल्याने प्रस्तापितांना हा मोठाच दे धक्का मानल्या जाऊ लागला आहे.
विशेष बाब अशी की राजकिय क्षेत्रातील मातब्बरांनी पहिल्यांदाच स्थानिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनवल्या असताना तालुक्याच्या विविध गावांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या असल्या तरी ऐन निवडणुकीत बहुजन समाजाने प्रस्तापितांना नाकारत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडुन दिल्याने राजकिय दृष्ट्या मातब्बरांसाठी आलेल्या अनपेक्षित निकालामुळे राजकिय वर्तुळात हा भुकंप मानल्या जाऊ लागला आहे.
तथापी स्थानिक ग्रामपंचायतींच्या निकालावरुन महाविकास आघाडीने घडवुन आणलेला परिवर्तन होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी धोक्याची घंटा मानल्या जाऊ लागली आहे.तथापि साम, दाम,दंड भेदाचा वापर करुन निवडणुक जींकण्याच्या मनसुब्यावर आता पाणी फेरल्या जाण्याची हाती आलेल्या निकालामुळे स्पष्ट झाले असल्याने भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसावी लागणार असल्याचे यामुळे बोलल्या जाऊ लागले आहे.