अहेरी तालुक्यातील १६ ग्राम पंचायतीवर आविसची एक हाती सत्ता माँड्रा ग्राम पंचायत अविरोध

120

अहेरी तालुक्यातील १६ ग्राम पंचायतीवर आविसची एक हाती सत्ता
माँड्रा ग्राम पंचायत अविरोध

अहेरी :- तालुक्यातील 29 ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडनूक पार पाडली आहे.
अतिदुर्गम माँड्रा ग्राम पंचायतीत फक्त आदिवासी विद्यार्थी संघांनी ग्राम पंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली आहे. आविसची पॅनल अविरोध निवडून आली आहे.
तर उर्वरित १६ ग्राम पंचायत इंदाराम,मेडपली,पेरमिली,येरमनार,कुरूमपली,दामरंचा,कमलापूर,रेपनपलीगोविंदगाँव,देचली,पेठा,वेलगुर,नागेपली,खमनचेरू,आदि ग्राम पंचायतींमध्ये आविसनी सत्ता संपादन केली आहे.
आविस नेते व माजी आमदार श्री. दिपक दादा आत्राम व जि .प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविन्यात आले. 29ग्राम पंचायात पैकी माँड्रा हे ग्राम पंचायत अविरोध वर आविस ने झेंडा फडकविल्याने स्थानिक राजकारणात व अहेरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,यांच्या मार्गदर्शनात अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री. भास्कर तलांडे,जि.प सदस्य श्री. अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,जि.स.सौ.अनिताताई आत्राम,प.स.उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,माजी प.स.सभापती तथा विद्यमान प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,प.स.सदस्या सौ.शितल दुर्गे,प.स.सदस्या छाया पोरतेट,प.स.सदस्या शारदा कोरेत,योगीता मौहूर्ले,प.स.सदस्य श्री.राकेश तलांडे,
इंदारामचे माजी सरपंच श्री.गुलाब सोयाम,ताणबोडीचे माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,पेरमिलीचे सरपंच श्री.प्रमोद आत्राम,रेगूलवाहीचे सरपंच श्री.लिंगाजी वेलादी,महागाँवचे उपसरपंच श्री.मारोती करमे,देवलमरीचे माजी उपसरपंच जगनाथ मडावी,आविसचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,आविसचे ग्रामीण अध्यक्ष मो. इरशाद शेख,मो.अरफाज शेख,शिवराम पूल्लूरी,सत्यम नीलम,भीमराव मडावी,श्रीनिवास राऊत,प्रकाश दुर्गे,लक्ष्मण आत्राम,आदिंनी मेहनत करून सहकार्य केले.