डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील अनिल वाघमारे यांची नियुक्ती

119

डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील अनिल वाघमारे यांची नियुक्ती

 

 

 

मुंबई- साप्ताहिक ‘डोंगरचा राजा’ आणि युट्यूब चॅनलचे संपादक, बीड जिल्ह्यातील वडवणी येथील पत्रकार अनिल वाघमारे यांची मराठी पत्रकार परिषदेचे एक अंग असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल..सध्याचं युग हे डिजिटलचं युग आहे.. महाराष्ट्रात पाच हजार पेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स, पोर्टल कार्यरत आहेत आणि दहा हजारांवर पत्रकार डिजिटलशी जोडलेले आहेत.. या माध्यमातील पत्रकारांचे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत त्या सोडवायच्या असतील तर डिजिटल मधील पत्रकारांनी संघटीत होणं आवश्यक आहे.. ही बाब विचारात घेऊनच मराठी पत्रकार परिषदेनं स्वतंत्र डिजिटल मिडिया परिषद ही शाखा सुरू केली आहे.. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू झालेल्या असून इतर जिल्ह्यात शाखा विस्तार करण्याची जबाबदारी अनिल वाघमारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.. राज्य कार्याध्यक्ष म्हणून अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित पदाच्या नेमणुका लवकरच केल्या जातील अशी घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे.. अनिल वाघमारे यांच्या नियुक्तीचे पत्रसृष्टीत स्वागत होत असून डिजिटल मिडियाशी संबंधित पत्रकारांनी अनिल वाघमारे यांच्या 9822548696 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई यांनी अनिल वाघमारे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत…

 

 

 

*****

 

 

 

 

 

म. संपादक,

 

कृपया वरील वृत्त प्रसिद्ध करावे ही विनंती.

 

अनिल महाजन,राज्य जनसंपर्क प्रमुख, मराठी पत्रकार परिषद- मुंबई. मो. 99229 99671

 

गो. पि. लांडगे, प्रसिद्धी प्रमुख, मराठी पत्रकार परिषद- धुळे, नंदुरबार. मो. 94227 95910