आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील समस्याचे निराकरण करा  आमदार कृष्णा गजबे यांची राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी

122

आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील समस्याचे निराकरण करा 

आमदार कृष्णा गजबे यांची राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी

महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे आणि मागास दुर्गम नक्षलग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा असून या जिल्ह्यातील विविध समस्यांचे निराकरण तात्काळ करावे अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे।

गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठ स्थलांतरित करण्याच्या शासन स्तरावर सुरू असलेला हालचालींवर निर्बंध घालून सदर विद्यापीठ गडचिरोली येथेच ठेवण्यात यावे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला दीक्षांत समारंभ रद्द करून गडचिरोली मुख्यालयी घेण्यात यावा. गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जातींची लोकसंख्या तपासून पेसा कायदा अंतर्गत समाविष्ट गावे कमी करण्यात यावे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गाचे ओबीसीचे आरक्षण घटनात्मक तरतुदीप्रमाणे १९ टक्के करण्यात लागू करण्यात यावे वडसा आरमोरी गडचिरोली येथील रेल्वे मार्ग प्रकल्पातील वन विभागाचा अडसर दूर करून रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात यावे जिल्ह्यातील चंद्रपूर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बेरोजगारांच्या फायद्यासाठी मतदार संघातील देसाईगंज वडसा जिल्हा गडचिरोली येथील वळू माता संगोपन केंद्र परिसरामध्ये मंजूर असलेले गोपालन व गो संवर्धन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे मतदार संघातील तालुक्यातून वाहणाऱ्या व गाढवि नदी सती नदीवरील पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत बंधाऱ्याचे बांधकाम करून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. आरमोरी मतदारसंघातील देसाईगंज वडसा, कुरखेडा ,कोरची, तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील कायदा १९८० असल्याने नादुरुस्त असलेला मामा तलाव वनविभागामार्फत दुरुस्त करून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करण्यात यावे राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशा विविध समस्यांचे निवेदन आमदार कृष्णा गजबे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यांच्या सोबत यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी हे सुद्धा उपस्थित होते तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खातेफोड करून स्वतंत्र सातबारे बनविण्याचे आदेश सुद्धा काढण्यात यावे या जिल्ह्यातील शेतकरी पिढ्यानपिढ्या एकाच सातबारावर एकाच कुटुंबाची नावे आहेत त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद सातबारावर असल्याने तेथे विकास झालेला नाही महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांची खाते फोड करून सातबारा स्वतंत्रपणे बनविण्याचे आदेश मा, जिल्हाधिकारी यांना तात्काळ देण्याची मागणी आ.कृष्णा गजबे व डॉ. देवराव होळी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे