नांदेड येथे दिव्यांग बांधवांचा मोर्चा !
माहुर तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव नांदेडला जाणार !
माहूर- राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार व प्रहार दिव्यांग प्रमुख नांदेड विठ्ठलराव मंगणाळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख,दिव्यांग संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर,व इतर मान्यवरांच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी विराट मोर्च्या आयोजित केला आहे मागण्या खलील प्रमाणे
२०१७ पासून चा जिल्हापरिषद ५%निधी,राखीव घरकुल व संडास योजना,ग्रामपंच्यायत ५%निधी,२००फूट जागा,मानधन वाढ,नगरपंचायत५%निधी,नगरपंचातच्या गाळ्या मध्ये दिव्यांगाना प्राधान्य देणे,संजय गांधी निराधार योजनेची बैठक प्रत्येक महिन्याला घेणे,बीजभांडवल योजनेचा लाभ मिळणे, दिव्यांग बांधवावर अन्याय झाल्यास दिव्यांग कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करणे व इतर अनेक मंगण्या संदर्भात आयोजित केलेल्या मोर्च्याला माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी हजर राहावे असे आव्हान प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर हुडेकर व शहर अध्यक्ष डॉ.बळवंत नागरगोजे यांनी केले आहे.