*पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांचा निषेध करावा तेवढा कमी*
*आमदार डॉक्टर देवराव होळी*
*पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथे जाहीर निषेध*
*मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या विरोधात चामोर्शी येथे निदर्शने*
*दिनांक १७ डिसेंबर २०२२ गडचिरोली*
*भारताचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधामध्ये पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेली टीका ही सर्व भारतीयांचा अपमान करणारी असून त्यांचा निषेध करावा तितका कमी असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी चामोर्शी येथील बिलावल भुट्टो जाहीर निषेध कार्यक्रमाच्या प्रसंगी केली यावेळी बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.*
*याप्रसंगी भाजपा किसान आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती प्राध्यापक रमेशजी बारसागडे, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, महामंत्री सुशांत रॉय, ज्येष्ठ नेते जयराम चलाख, प्रशांत पालारपवार, भुवनेश्वर चुधरी, विनोद पेशट्टीवार, प्रकाश सरकार, डोमदेव विजय गेडाम, वन्नेवार , रामचंद्र वैरागडे भोजराज भगत, सातपुते अनिल भैसारे , दीपक वासेकर यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.*
*भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात देशाचे नाव उंचावले असून पाकिस्तान सर्व बाजूंनी डबघाईस आलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून भारताच्या अतिशय लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधानाच्या बाबतीत असे वक्तव्य करणे हे पाकिस्ताच्या नेत्यांच्या विकृत मानसिकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या आंदोलनाच्या प्रसंगी केले.*