महिला महाविद्यालय परिसरातील ओपनस्पेसचे सौंदर्याीकरण करा :-
कुणाल पेंदोरकर यांची मागणी
शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे नगर प्रशासनाला निवेदन
गडचिरोली :- गडचिरोली शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या चंद्रपूर रोडवरील महिला महाविद्यालय परिसरातील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करून या परिसरातील वयोवृध्द नागरिक व बालकांना विरगुंळयाचे सोयी निर्माण करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काॅंग्रेस कमेटी सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने पेंदोरकर यांनी आज 25 जानेवारी रोजी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन देउन लक्ष वेधले.
पेंदोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, महिला महाविद्यालय जवळील कोर्ट कालॅनी जवळ खडसे ले- आऊट मधील ओपन स्पेस जवळपास ६ हजार स्क्वेअर फुट जागा उपलब्ध आहे. या परिसरात कोर्ट काॅलनी, अनमोल नगर, रेव्हनी काॅलनी, रामटेके डुप्लेक्स आदी परिसर असून या परिसरात मोठी वस्ती आहे. मात्र याठिकाणी नागरिकांसाठी एकही विरगुंळयाचे साधन नाही. या ठिकाणी ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण झाल्यास जेष्ठ नागरिक, मुले,, महिलांना सकाळ सायंकाळी विरगुंळयासाठी साधन उपलब्ध होईल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची एकमुखी मागणी लक्षात घेता महिला महाविद्यालय परिसरातील खडसे लेआऊट मध्ये सौंदर्यीकरणाचे काम मंजूर करावे आणि या परिसरातील नागरिकांना सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा काॅंग्रेस कमेटी सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर व शेकडो नागरिकांनी मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देतांना कुणाल पेंदोरकर, , स्वप्निल अडेट्टीवार, परशुराम वाढणकर,शामराव सिलमवार,बाबुराव कातरकर , नरेश मेश्राम,प्रमोद बोधाने,प्रफुल बीजवे, साई सिलमवार, नारायण गोरले,अमित तलांडी, शरद गिऱ्हेपुंजे, श्रीकांत कातरकर, सुधाकर मेश्राम, यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.