डॉ. चंदाताई कोडवते यांनी साधला गावातील लोकांशी संवाद
*चामोर्शि तालुक्यातील अनेक गावांत सदिच्छा भेट*
आज डॉ. चंदाताई कोडवते, सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँगेस यांनी दुर्गापुर, चित्तरंजनपुर, वायगाव आणि रविंद्रपुर या गावात सदिच्छा भेट घेऊन राजकीय सध्यास्थिती बद्दल माहिती घेतली व गावातील लोकांशी संवाद साधला.
यावेळेस बीजन सरकार माजी सरपंच दुर्गापूर, प्रेमानंद गोंगले NSUI तालुका अध्यक्ष, परिमल बहादूर माजी उपाध्यक्ष तालुका काँगेस कमिटी चामोर्शी, अशोक हलदार दुर्गापूर, डॉ. विश्वास दुर्गापूर, अजित परमाणिक दुर्गापूर, मनोरंजन हलदार चित्तरंजनपूर,रमेश मंडल चित्तरंजनपूर, सुरज मंडल उपसरपंच रविंद्रपूर, कृष्णा मंडल रविंद्रपूर, नितीश बिश्वास रविंद्रपूर, यांच्यासह काँगेस कार्यकर्ते, गावातली ज्येष्ठ नागरीक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.