नाशिक-शिर्डी अपघातातील रुग्णांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद

37

नाशिक-शिर्डी अपघातातील रुग्णांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद!

 

नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. यातील सात मृतांची ओळख पटली असून पालकमंत्री दादा भुसे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत.

 

यामध्ये जवळपास 45 प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सात मृत प्रवाशांची ओळख पटली असून अद्याप तीन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. ते सर्व अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे समजते आहे. शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले होते, मात्र वाटेत भीषण संकटाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले होते त्यानंतर आज स्वतःहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून रुग्णांना धीर देऊन वैद्यकीय सेवेत कोठेही कमी पडू नयेत असे आदेश साहेबांनी हॉस्पिटलला दिलेत. यावेळी नातेवाईकांनी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले.