नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 27 अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 22 उमेदवार रिंगणात आ

62

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ कुणामध्ये लढत?

 

 

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 27 अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 22 उमेदवार रिंगणात आहे…

 

 

त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार उमेदवार म्हणजे

 

 

1) नागो गाणार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार… भाजपचा त्यांना पाठिंबा…

 

 

2) सुधाकर अडबाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार… ( हे काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांची पसंती असल्याचे बोलले जात आहे.. मात्र काँग्रेसने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही…)

 

 

3) राजेंद्र झाडे, कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे उमेदवार ( यांनीही काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता.. मात्र काँग्रेस नेत्यांकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे)

 

 

4) सतीश इटकेलवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालेला नाही.