22 लाखांच्या निधीतून होणार रस्त्याचे बांधकाम माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते झाले भूमिपूजन
अहेरी:-अहेरी-महागाव मुख्य रस्त्यापासून ते वांगेपल्ली पर्यंत तब्बल 22 लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.
अहेरी-महागाव ते वांगेपल्ली गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत निधीसाठी प्रयत्न केले.अखेर सदर रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल 22 लाख रुपयांची निधी मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.
या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेता भाग्यश्री ताई आत्राम यांनी त्वरित रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र,आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सदर कामाला थोडंस विलंब झाला होता.आदर्श आचारसंहिता संपताच पुन्हा विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे.आदिवासी उपयोजना अंतर्गत निधी मंजूर असून लवकरच या रस्त्याचे बांधकाम सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,माजी सरपंच पुष्पा आत्राम,माजी उपसरपंच श्यामराव पानेम,मखमुर शेख,बाबुराव तोर्रेम, गंगाराम पानेम,अनिल मडावी,लक्ष्मण पानेम,राकेश तोर्रेम,शंकर मडावी,यशवंत आत्राम,गणेश आत्राम तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.