देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व रयत शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ऑनलाइन रांगोळी स्पर्धा निकाल जाहीर

115

देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व रयत शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ऑनलाइन रांगोळी स्पर्धा निकाल जाहीर

देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व रयत शेतकरी संघटना
यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी निमित्त भव्य ऑनलाइन रांगोळी स्पर्धां चे आयोजन केले होते.

सांगली:- सदर स्पर्धा देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षा पुजा उदगट्टे यांच्या अध्यक्षतेखाली व रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. अॅड. रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख व रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. सदर स्पर्धेचे नियोजन रयत शेतकरी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष रेखाताई माळी यांच्या नेतृत्वाखाली झाले. सदर रांगोळी स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्र साठी खुली होती. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : स्नेहल धाडवे, मुंबई प्रथम पारितोषिक 3D 3 बर्नर ग्लास टॉप शेगडी व प्रमाणपत्र , काजल कांबळे , कोल्हापुर द्वितीय पारितोषिक इंडक्शन + 5 भांडी व प्रमाणपत्र , तनया बांबुळकर, पुणे तृतीय पारितोषिक मिक्सर व प्रमाणपत्र केदार टेमकर, सिंधुदुर्ग चतुर्थ पारितोषिक राज्यस्तरीय कला रत्न पुरस्काराने सन्मानित व प्रमाणपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एक हात मदतीचा या उद्देशाने स्पर्धेसाठी जमा होणारी फी एकत्र करून जमा झालेली रक्कम स्थानिक स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद शाळेस शैक्षणिक साहित्य स्वरूपात देण्यात आली. सदर स्पर्धेस मोलाचे सहकार्य लाभलेले मान्यवर पुढील प्रमाणे नयना ताई गवळी – औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना, गणेश ढाकणे – गेवराई तालुका अध्यक्ष रयत शेतकरी संघटना, पोपट नरळे – सामाजिक कार्यकर्ते, सागर जगताप – सामाजिक कार्यकर्ते, योगेश कांबळे – देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव, आकाश महाडिक सांगली जिल्हा युवा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना, सैय्यद निलोफर जाफर – देवांश फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हाध्यक्ष, प्रशांत घिवे देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य – बुलढाणा जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष तसेच देवांचे फाऊंडेशनचे सर्व अधिकारी व पदाधिकारी आणि रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अधिकारी व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.