विकासात्मक कामे होणे अत्यावश्यक विधानपरिषद विरोधी पक्षनेते दानवे यांचे प्रतिपादन अहेरीत शिवसंवाद कार्यक्रम

42

*विकासात्मक कामे होणे अत्यावश्यक*

विधानपरिषद विरोधी पक्षनेते दानवे यांचे प्रतिपादन

*अहेरीत शिवसंवाद कार्यक्रम*

 

*अहेरी*- विकासाच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा व प्रमुख्याने अहेरी उपविभाग मागासला असून विकासात्मक कामे होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले

ते सोमवार 13 फेबूवारी रोजी शिवसंवाद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघटना प्रसंगी उदघाटनीय स्थानावरुन बोलत होते.

यावेळी अध्यक्ष स्थानी पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा प्रमुख रियाज शेख, जिल्हा संघटक विलास ठोंबरे, वासुदेव शेडमाके, विलास कोडाप, अरविंद कात्रटवार, महिला प्रमुख छायाताई कुंभारे, धर्मा राय आदी मान्यवर होते.

उदघाटनीय स्थानावरुन बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, सिंचन, शिक्षणाचे गंभीर प्रश्न जैसे थे असून मुख्यतः रस्त्याची अवस्था तर अत्यंत भयानक असून रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ते हेच समजायला मार्ग नसून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडून सरकारचे लक्ष वेधन्यासाठी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात आवाज उचलनार असल्याचे आवर्जून सांगितले.

तत्त्पूर्वी अंबादास दानवे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे फित कापून विधिवत व शाही थाटात उदघाटन केले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.मातोश्री मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून अभिवादन केले.

यावेळी पक्षाचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी, अहेरी उपविभागातील मूलभूत प्रश्न व समस्यांचे पाढ़ा वाचून तात्काळ समस्या व प्रश्न मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे म्हणत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे यानी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप सुरपाम यांनी मानले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.