आदिवासीच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची गौरव गाथा,शौर्यगाथा, शूरता वीरता, प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये या क्रांतीनाटकाच्या माध्यमातून पोहोचावे

40

*आदिवासीच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची गौरव गाथा,शौर्यगाथा, शूरता वीरता, प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये या क्रांतीनाटकाच्या माध्यमातून पोहोचावे*….

*सुधिरभाऊ मुनगंटीवार*

———————————————–

*आदिवासीचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांची १५ नोव्हेंबर ही जयंती देशात गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल हे केवळ देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केल.*

*असे प्रतिपादन या गौरव गाथा क्रांतीनाटय प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानी केले.*

———————————————–

दिं २३ फेब्रुवारी २०२३

 

पोंभुर्णा:-सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने,आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या झारखंडच्या सुपुत्राची गौरव गाथा या क्रांती नाट्याच्या माध्यमातून जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडाच्या जीवनावर आधारित जीवन चित्रपट धरती आबा बिरसा मुंडा या नाटय प्रयोगाचं आयोजन मौजा- पोंभुर्णा ता.पोंभुर्णा जि.चंद्रपूर येथे करण्यात आले.

 

जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित जीवन चित्रपट क्रांतीनाटकाच्या आयोजीत कार्यक्रमांच्या उद्घाटक प्रसंगी सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी बोलतांना

बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी जे कार्य केले ते प्रेरणादायी आहे.या क्रांतीनाट्यकाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारलेली धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जीवनात घडलेल्या घडामोडी वर जे जे काही चांगले संदेश घेता येईल.ते ते चांगले विचार आत्मसात केले पाहिजे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने आदिवासी च्या जनजातियां संबंधि अंधार दूर करुन प्रकाशाकडे नेण्याचं काम मी करीन.शासनाच्या ज्या ज्या योजना जनजातीय विषयी आहेत त्या करण्याचा मी प्रयत्न करीन.आदिवासीच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची गौरव गाथा, शौर्यगाथा, शूरता वीरता, प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये या क्रांतीनाटकाच्या माध्यमातून पोहोचावे असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थितांना केले.

 

खासदार अशोकजी नेते यांनी क्रांती नाट्य गौरव गाथा या प्रयोगाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना या देशात सर्वोच्च पदावर,व या देशाचे प्रथम नागरिक आदिवासीच्या प्रथम महिला या देशाचे राष्ट्रपती म्हणुन सर्वोच्च पदावर द्रौपदी जी मुर्मू आहेत. हि एक आदिवासीच्या समाजासाठी गौरवाची,कौतुकास्पद बाब आहे.

तसेच या देशाचे लाडके पंतप्रधानांनी या देशात आदिवासीच्या ७५ शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी जे बलिदान दिले.अशा शुरविरांचा, क्रांतिकारकांचा त्यांचे स्मारक सुद्धा व्हावे अशी संकल्पना सुद्धा मांडली.

देशात अनेक शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्याच्या युध्दात जे साठी बलिदान दिले तेव्हा प्रथमतः वंदे मातरम हे ब्रीद वाक्य उच्चारले जाते.आदिवासीचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांची १५ नोव्हेंबर ही जयंती देशात गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल हे केवळ देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केल.

असे प्रतिपादन या गौरव गाथा क्रांतीनाटय प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानी केले.

 

महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची जान जय जय महाराष्ट्र माझा …..या गीताने नाटयरसिक व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

 

याप्रसंगी सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक,मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर /गोंदिया, अशोकजी नेते खासदार गडचिरोली/चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस संघटन एस.टी मोर्चा,हरिषभैया शर्मा माजी जिल्हाध्यक्ष,संध्याताई गुरुनुले, माजी जि.प.अध्यक्षा,अल्काताई आत्राम भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा,सुलभाताई पिपरे नगराध्यक्ष पोंभुर्णा,आशिषजी देवतळे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा,अजित मंगरुगिरीवार उपनगराध्यक्ष,स्वप्निल वरघंटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नंदुभाऊ रणदिवे माजी उपाध्यक्ष न.प.मुल,संजय पंदिलवार भाजपा नेते,रेवनाथ कुसराम एस.टी मोर्चा चे महामंत्री, दिलीप म्याकलवार प्रसिद्धी प्रमुख,पंकज लाडवे भाजपा युवा मोर्चा, तसेच पोंभुर्णा येथील अधिकारी वर्ग, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,नाटय रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.